शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात 'त्यांच्या' दातृत्वाने उजळणार २१ रुग्णांच्या नेत्रज्योती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:23 IST

रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे.

ठळक मुद्देमोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी ५४ हजार रुपयांची मदतशिरुडे भावंडांनी केला क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांच्याकडे धनादेश सुपूर्दशिरुडे बंधूंच्या दातृत्वातून २१ गरजू रुग्णांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

जिजाबराव वाघ/आॅनलाईन लोकमतचाळीसगाव,दि.५ : वर्षश्राद्धाचं काहीसं शोकाकुल वातावरण. मंत्रोच्चारात सुरु असणारा पुजाविधी. मृत व्यक्तिच्या स्मृतीप्रित्यर्थ आप्तेष्टांना काही तरी भेटवस्तू देण्याची लगबग. मात्र याचंवेळी दोघा मुलांनी आईच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी मोतीबिंदू असणा-या गरजू रुग्णांना ५४ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे. परंपरेला टाळून नवा आदर्श निर्माण करणा-या रामकृष्ण व प्रभाकर निंबा शिरुडे यांचं कौतुक होत आहे.कै. शांताबाई निंबा शिरुडे यांचे वर्षश्राद्ध नुकतचं झालं. लाडशाखीय वाणी समाजात मृत व्यक्तिच्या स्मृतीप्रित्यर्थ नातेवाईकांना भांड्याच्या रुपात भेट वस्तू देण्याची पारंपारिक पद्धत आहे. मात्र अलिकडे सामाजिक घुसळण होऊन समाजपयोगी उपक्रम राबविण्याकडे समाजाचा कल वाढला असून शिरुडे परिवाराने एक पाऊल पुढे टाकले आहे.प्रभाकर निंबा शिरुडे यांना रोटेरियन भास्कर पाटील यांनी आईच्या स्मृती प्रित्यर्थ समाजहिताच्या उपक्रमास मदत करण्याचा सल्ला दिला. यावर प्रभाकर व रामकृष्ण या दोघा भावंडांनी रोटरी क्लबतर्फे ६८ गरजू रुग्णांवर होत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी ५४ हजार रुपयांची मदत दिली. शिरुडे बंधूंच्या दातृत्वातून २१ गरजू रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार असून त्यांना नवी दृष्टीच प्राप्त होणार आहे. याचं कार्यक्रमात शिरुडे भावंडांनी क्लबचे अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांच्याकडे ५४ हजाराचा धनादेश सुपूर्द केला. परंपरेला छेद देतांना सामाजिक कामांची नवी वाट निर्माण करणा-या शिरुडे परिवाराच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी योगेश शिरुडे, हिरालाल शिनकर, प्रफुल्ल शिरुडे, दिनेश पाखले, किरण कोतकर यांनी सहकार्य केले. रोटरीचे राजेंद्र कटारिया, ब्रिजेश पाटील, विनोद बोरा, समकित छाजेड, रोशन ताथेड, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगाव