शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२० वर्षीय तरुणीवर अत्याचार करीत विष देऊन केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 19:07 IST

तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे लैंगिक अत्याचार केला व यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष देण्यात आले.

ठळक मुद्देकासोदा येथील घटना तिघा तरुणांसह महिलेविरुद्ध गुन्हा

पारोळा :  तालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे लैंगिक अत्याचार केला व यानंतर वाच्यता होऊ नये म्हणून तिला विष देण्यात आले. तेथून तशाच अवस्थेत पारोळा येथे आणत मळ्यात फेकून  दिले. दुसऱ्या दिवशी ती बेशुद्धावस्थेत आढळली, मात्र उपचार घेत असताना तिचा १० रोजी पहाटे मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने पारोळा तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात खळबळ माजली आहे. याप्रकरणी टोळी गावातील २ संशयिताना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य एक तरुण व त्यांना सहकार्य करणारी महिला अशा दोघांच्या शोधात पोलीस आहेत.    या निंदनीय पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, टोळी ता. पारोळा येथील २० वर्षीय तरुणी ही पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होती. ती दिवाळीच्या सुटीत पारोळा येथे वास्तव्याला असलेले तिच्या मामांकडे ३ नोव्हेंबर पासून आली होती. ७ रोजी दुपारी अडीच वाजता मेडिकलवर जाऊन येते असे सांगून घरून निघाली. पण बराच उशिरा पर्यन्त घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. तपास न लागल्याने तिच्या मामांनी पारोळा पोलिस ठाण्यात भाची हरविल्याची नोंद ८ रोजी सकाळी १०वाजता केली. यानंतर ८ रोजीच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ती जुलूमपुरा येथील लालबागच्या मळ्यात विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यावेळी या ठिकाणी काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना ही मुलगी दिसली. त्यांनी लगेच मोटारसायकलने तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे भाऊसाहेब हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवस तिच्यावर उपचार झालेत. तिने मृत्यूशी झुंज दिली पण १० रोजी पहाटे ४ वाजता तिची प्राणज्योत विझली.        दरम्यान या तरुणीला ८ रोजी उपचारासाठी धुळे येथे नेत असतांना तिला फागणे गावाजवळ शुद्ध आली होती. काय प्रकार झाला, त्या विषयी विचारणा केली असता तिने  सांगितले की, ओळखीचा शिवनंदन पवार याने मला गुंगीचे औषध देऊन त्याच्या सोबत असलेले पप्पू अशोक पाटील , अशोक वालजी पाटील (सर्व, रा. टोळी )  या तिघांनी  पारोळा येथून बळजबरीने एका वाहनातून मला कासोदा येथे नेले व गुंगीचे औषध देऊन रात्रभर माझ्यावर आळीपाळीने  बलात्कार केला  तसेच वाच्यता होऊ नये म्हणून मला बळजबरी विष पाजले. ही घटना पिडीतेने आई व मामा व बहीण  यांच्याजवळ कथन केली. दरम्यान धुळे येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर  १० रोजी पहाटे ४ वाजता तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.यावेळी मयत पिडीतेच्या मामाने भाचीने मृत्यूपूर्वी दिलेल्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघे तरुण व अन्य साथ देणारी एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भीतीने एका आरोपीने घेतले वीषया तरुणीवर बलात्काराच्या प्रकरणात असलेला शिवनंदन शालीक पवार या  आरोपीने अटक होण्याच्या भीतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ उपचार झाल्याने तो वाचला आहे. त्याच्यावर धुळे येथे एका रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा पहारा दवाखान्यात लावण्यात आला आहे. दवाखान्यातून सुटी मिळाल्यावर त्यास ताब्यात घेण्यात येणार आहे.दरम्यान अन्य एकास  आधीच ताब्यात घेतले  असून त्याची विचारपूस सुरू आहे.

तिसऱ्या आरोपीच्या शोधत पथक रवानाया घेतनेतील शिवनंदन व अशोक वालजी पाटल हे दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर तीसरा तरुण पप्पू व  साथ देणारी महिला यांच्या   शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी दिली.

बहिणीने फोडला टाहोकायगुन्हा होता माझ्या बहिणीच्या, तीन नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला जीवे ठार मारले. माझ्या बहिनीचा नाहक बळी घेणाऱ्या नराधमांना अटक करावी. अटक झाल्यावरच आम्ही बहिणीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून असा आक्रोश करीत मन हेलावून टाकणारा टाहो अत्याचार झालेल्या तरुणीच्या बहिणीने पोलिस प्रशासनासमोर फोडला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParolaपारोळा