शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या गुन्ह्यात २० लाखाचा ऐवज हस्तगत; आठ जणांच्या अटकेसह एक बालक ताब्यात

By सुनील पाटील | Updated: May 27, 2024 19:53 IST

जळगाव, दहिवदची घटना : आठ जणांच्या अटकेसह एक बालक ताब्यात

जळगाव : शहरातील सौरभ ज्वेलर्स व दहिवद (ता. चाळीसगाव) येथे पडलेल्या दरोड्याच्या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत २० लाखाचा ऐवज हस्तगत केला असून आठ जणांचा अटक तर एका विधीसघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भाची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

दहिवद गावात  १२ मे रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी घनःशाम धर्मराज पाटील-वाघ यांच्या घरात दरोडा टाकून घरातील रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह १६ लाख १५ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल हा दरोड्याचा गुन्हा चौदा दिवसानंतर उघडकीस आला आहे. अटकेतील संशयीतांना पेालिसी खाक्या दाखवताच संशयीतांनी गुन्ह्याची कबुली देत १६ लाख १५ हजारांचा ऐवज काढून दिला आहे. कालूसिंग हुजारीया बारेला(वय-५२), सुनील मुरीलाल बारेला(वय-२१,रा.बुलवाणीया सेंधवा) यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले.

यापूर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे पचवले सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स दरोडा प्रकरणात सहा संशयीतांच्या टोळीला अटक करुन पेालिसांनी त्यांच्याकडून आज अखेर ४ लाख ६७ हजार रुपयांचा  ऐवज जप्त केला आहे. अटकेतील टोळीने यापुर्वी सराफ बाजारात तीन मोठे गुन्हे पचवल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली. त्या गुन्ह्यांचा मास्टरमाईंड रितेश संतोष आसेरी असल्याचे निष्पन्न झाले.

रणजीत सिंग जिवनसींग जुन्नी(वय-३२), सागरसिंग जिवनसींग जुन्नी(वय-३५), झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसींग जुन्नी(वय-३४)राम ऊर्फ सोनू भगवानसारवान(वय-२९),रितेश संतोष आसेरी(वय-४४), दिपक भक्तराज गोयर(वय ३४) अशा सहा संशयीतांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक अधीक्षक अभयसिंग देशमुख, गुन्हेशाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हे गुन्हे उघडकीस आणले.

टॅग्स :Jalgaonजळगाव