शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा १९ हजार महिलांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:40 IST

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून ४८२ दिवसांमध्ये जिल्ह्यात १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्र शासनाची योजना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरितलाभार्थीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना

अजय कोतकरलोकमत न्यूज नेटवर्कगोंडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून ४८२ दिवसांमध्ये जिल्ह्यात १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.प्रधानमंत्री मातृवंदना योजना ग्रामीण व शहरी भागात लागू करण्यात आली आहे. भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. त्यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाºया नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रित रहावा यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना संपूर्ण देशात १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केली आहे.या योजनेंतर्गत पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेतून त्यांच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी तीन टप्प्यात देण्यात येतो. पहिल्या टप्प्यात मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यास १ हजार रुपये, दुसरा हप्ता किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर २ हजार रुपये व तिसरा हप्ता बाळाचे जन्मनोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला १४ आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर २ हजार रुपये लाभार्र्थींच्या खात्यात जमा करण्यात येतो.या योजनेचा लाभ शासकीय सेवेत असणाºया माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.योजनेसाठी आवश्यक कागदपत्रेयोजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधारकार्ड, बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसांच्या आत नोंदणी प्रमाणपत्र, शासकीय संस्थेत गरोदर दरम्यान तपासणी प्रमाणपत्र याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेंतर्गत पत्र लाभार्र्थींना शासकीय तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे आर्थिक सहाय्यदेखील मिळतात.गर्भवती महिलांमध्ये एकूण स्रियांपैकी ३० टक्के माता आजही बाळंतपणादरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर असतात. प्रसंगी दर लाख गर्भवती मातांमध्ये १०० माता दगावतात. यामुळे गरोदरपणातील आजारपण व बाळंतपणातील मृत्यू हे धोके टाळण्यासाठी आहारदेखील महत्त्वाचा आहे. अटींची पूर्तता करून योजनेचा लाभ लाभार्र्थींच्या खात्यावर जमा करण्यात येतो.या योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील १९ हजार २७० महिला लाभार्र्थींना ६ कोटी ४ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्र्थींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुकानिहाय तालुका आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समूह संघटक आशा कर्मचाºयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.-डॉ. बबिता कामलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प., जळगाव

टॅग्स :Healthआरोग्यChalisgaonचाळीसगाव