शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील १९ महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश थांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:59 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील १६ महाविद्यालयांनी फक्त संलग्नीकरणाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली असली तरी काही अटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास विद्यापीठाने मनाई केली आहे.

ठळक मुद्देपदवी व पदव्युत्तर वर्गास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास केली मनाईअटींची पूर्तता राहिली अपूर्णउपकुलसचिव जी.एन.पवार यांनी काढले आदेश

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील १६ महाविद्यालयांनी फक्त संलग्नीकरणाच्या विस्तारास मान्यता देण्यात आली असली तरी काही अटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या महाविद्यालयांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास विद्यापीठाने मनाई केली आहे.सन २०१८/१९ या वर्षासाठी संलग्नीकरणाचे प्रस्ताव महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे सादर केले होते. या महाविद्यालयांची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी स्थानिक तपासणी समिती नियुक्त केली होती. समितीने सादर केलेला अहवाल हा अधिष्ठाता मंडळाच्या १६ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. अधिष्ठाता मंडळाने विद्यार्थी प्रवेशासंदर्भात विद्या परिषदेच्या २९ मे रोजी झालेल्या सभेत शिफारसी सादर केल्या.त्यानुसार ज्या महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०१८/१९ करीता पदवी/पदव्युत्तर वर्गास प्रथम वर्षास किंवा थेट द्वितीय वर्षास विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांनी संलग्नीकरणाच्या नुतनीकरणाच्या पत्रात नमूद केलेल्या अटींची पूर्तता करण्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र सादर करण्यासह प्राचार्य, ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण संचालक व नियुक्तीचे पुरसे प्रयत्न केल्याबाबत दस्तऐवज सादर करण्याची सूचना केली आहे.मनाई केलेल्या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास हे प्रवेश मान्य करण्यात येणार नाहीत व त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधित महाविद्यालयांची राहिल असे आदेश उपकुलसचिव जी.एन.पवार यांनी काढले आहे.या महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेशाला मनाईआर.आर.वरिष्ठ महाविद्यालय, जळगाव,के.नारखेडे कॉलेज आॅफ सायन्स, भुसावळ, आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज, धानोरा, नंदुरबार, आर्ट,कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज वलवाडी, धुळे, विज्ञान महाविद्यालय, शहादा, कॉमर्स, सायन्स व मॅनेजमेंट कॉलेज, थाळनेर,धुळे, आर्ट कॉलेज चोपडा, आर्ट, कॉमर्स व सायन्स कॉलेज, पाल, ता.रावेर, श्री बलराम पाटील आर्ट अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज बेहेड, जि.धुळे, आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, बोराडी, जि.धुळे, कला महाविद्यालय कोळगाव, ता.भडगाव, आर.के.एम.सीनिअर कॉलेज बहादरपूर, ता.पारोळा, स्वामी विवेकानंद आर्ट,कॉमर्स, कॉलेज जामनेर, श्री.काकासाहेब हिरालाल चौधरी आर्ट, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज नंदुरबार, जी.एच.रायसोनी कॉलेज आॅफ आटर्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, जळगाव, ललित कला महाविद्यालय, जळगाव, कॉलेज आॅफ एज्युकेशन, नंदुरबार, जी.एच.रायसोनी स्कूल आॅफ लॉ, शिरसोली रोड, जळगाव, इन्स्टीट्यूड आॅफ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज,चाळीसगावचा समावेश आहे.

 

टॅग्स :North Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठJalgaonजळगाव