शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

पाण्यातून १९ जणांना विषबाधा

By admin | Updated: March 4, 2017 00:53 IST

अजंतीसीम येथील प्रकार : उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

चोपडा : तालुक्यातील  अजंतीसीम येथील भिल्ल वस्तीतील  १९ जणांना पाण्यातून विषबाधा झाली आहे. या सर्वांना उलट्या व संडास होऊन ताप आल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तालुक्यातील अजंतीसीम येथे गावाला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनमध्ये विषारी पदार्थ  आल्याने भिल्ल वस्तीतील १९ जणांना २ रोजी दुपारी विषबाधा झाली. या सर्वांना मळमळ, उलट्या, संडास होऊ लागली. यापैकी काहींना होळनाथे (ता.शिरपूर) व काहींना हातेड बुद्रूक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी या सर्व रुग्णांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  रुग्णांवर  उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. पंकज पाटील यांनी उपचार केले आहेत. या सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.दरम्यान, पाण्याचा नमुना घेतला असता पाणी पिण्यायोग्य असल्याचे, वढोदा उपकेंद्राचे डॉ. दिनेश निळे यांनी सांगितले. नेमके कारण शोधण्यास यंत्रणा अपुरी गावातील प्रकार हा आदिवासी गरीब परिवारांमध्ये झाला म्हणून याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. हातेड आरोग्य केंद्रातून सुटका करून रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात भरती होत आहेत. हाच प्रकार गावातील उच्चभ्रू वस्तीत घडला असता तर आरोग्य, प्रशासन, पदाधिकारी अशा सर्व यंत्रणा कामाला लागल्या असत्या, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे.दरम्यान, प्रत्येक रुग्णास हजार-हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्य सहसचिव कॉ. अमृतराव महाजन यांनी केली आहे.                       (वार्ताहर)सुंदरबाई ज्ञानेश्वर भिल (२२), ज्ञानेश्वर तुकाराम भिल (२८),  सुनील रघुनाथ भिल (१६), कमल सखाराम भिल (२७) , छोट्या गणेश भिल (२०), संदीप सखाराम भिल (२५), विनोद वेडू भिल (३५), हरी तुकाराम भिल (६०), योगिता शांताराम भिल (७), मोतीलाल सखाराम भिल (४०), ममता मोतीलाल भिल (१७), रुपाली विनोद भिल(९), सरला कैलास भिल (२६), सखाराम दुला भिल (५५), विमल हरी भिल (२५), सोनू ज्ञानेश्वर भिल (७), दीपक शांताराम भिल (१८), समाधान सखाराम भिल (१८), गोकूळ मोतीराम भिल (२२), दीपक शांताराम भिल (१४, सर्व रा. अजंतीसीम) यांचा समावेश आहे. यातील काही मंडळी सत्रासेन येथे लग्नाला गेली होती. तेथून आल्यावर हा प्रकार घडल्याने अन्नातून विषबाधा झाली असावी.                   -डॉ.आशिष सोनवणे.वैद्यकीय अधिकारी, प्रा.आ.केंद्र हातेड.गावात बंद गटारी आहेत. कुठेही पाईपलाईन लिकेज नाही. सर्वत्र स्वच्छता आहे.                        -एस.एन.सोनवणे,ग्रामसेवक अजंतीसीम अजंतीसीम येथील रुग्णांना पाण्यातून अथवा अन्नातून विषबाधा झाली असावी.                     -डॉ. गुरुप्रसाद वाघ,उपजिल्हा रुग्णालय, चोपडा.