जळगाव- मेहरूण परिसरातील इंद्रप्रस्थनगरातील रहिवासी आसमाबी खलील देशमुख यांनी घरातील पलंगावर ठेवलेली १७ हजार ५४५ रूपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे़ आसमाबी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल आहे़पती खलील देशमुख यांना कामावर जायचे असल्यामुळे आसमाबी यांनी त्यांच्यासाठी जेवणाचा डबा बनविला़ त्यानंतर खलील हे कामावर गेले़ त्यानंतर सकाळी ९ वाजता आसमाबी यांनी गळ्यातील सोनसाखळी काढून ती घरातील पलंगावर ठेवून बाहेर गेल्या. काही वेळानंतर घरात आल्यावर त्यांना पलंगावर ठेवलेली सोन्याची पोत गायब झालेली दिसली़ घरात शोध घेऊन देखील काहीही मिळून न आल्यामुळे त्यांना पोत चोरीला गेल्याची खात्री झाली़ अखेर शुक्रवारी आसमाबी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध फिर्याद दिली.
जळगावात १७ हजारांची सोनसाखळी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 19:46 IST
मेहरूण परिसरातील इंद्रप्रस्थनगरातील रहिवासी आसमाबी खलील देशमुख यांनी घरातील पलंगावर ठेवलेली १७ हजार ५४५ रूपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे़
जळगावात १७ हजारांची सोनसाखळी लांबविली
ठळक मुद्देमेहरूण परिसरातील घटनाएमआयडीसी पोलिसात गुन्हापलंगावर ठेवलेली सोनसाखळी लांबविली