शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांच्या बाळासह १५ जण निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:37 IST

दिलासा : समता नगरातील १५ जणांना सोडले घरी; परिसरात सील कायम

जळगाव : समता नगरात बाधित महिलेच्या संपर्कातील तिच्या दहा दिवसांच्या बाळासह १५ जणांचे कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे़ तीन दिवसांपासून हे १५ जण शाहू महाराज रुग्णालयात क्वॉरंटाईन होते़बुलडाणा जिल्ह्यातील २१ वर्षीय विवाहिता समतानगरात तिच्या माहेरी आलेली असताना तिला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल २ मे रोजी प्राप्त झाला होता़ या महिलेला दहा दिवसाचे बाळ असल्याने त्याच्यासह नातेवाईक व हायरिस्क कॉण्टॅक्ट अशा १५ जणांना त्याच दिवशी शाहू महाराज रुग्णालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते़

वडिलांचा अहवाल पॉझिटीव्हहायरिस्क संपर्कांमध्ये या महिलेचे वडील, बाळ व १५ जणांचा समावेश होता़ त्यांना शाहू महाराज रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणीसाठी कोरोना रुग्णालयात आणण्यात आले होते़ वडिलांचे अहवाल सोमवारीच रात्री प्राप्त झाले होते़ त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोरोना कक्षात हलविण्यात आले़ त्यानंतर मंगळवारी अन्य संपर्कातील लोकांचे अहवाल प्राप्त झाले़ त्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत़

संपर्कातील लोकांची शोधा-शोधबाधित रुग्णांकडून किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंकडून वेळेवर योग्य माहिती समोर येत नसल्याने आरोग्य यंत्रणेचीही तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे़ संपर्कातील लोकांचा शोध घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे़ बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोक समोर येत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे़ सम्राट कॉलनी परिसरातच सतत तीन दिवस वैद्यकीय पथकाला हे शोधकाम करावे लागले़सम्राट कॉलनीतील ३० जण क्वॉरंटाईनसम्राट कॉलनीतील बाधित तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर या परिसरातील त्याच्या संपर्कातील ३० जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे़ त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत़ समता नगर व सम्राट कॉलनी परिसरात महापालिका वैद्यकीय पथकाने सर्वेक्षणाचे काम सुरू केलेले आहे़ परिसर ठरवून दिलेला असून त्यातील प्रत्येक घरात जाऊन कोणाला काही लक्षणे आहेत का याची तपासणी वैद्यकीय पथकामार्फत केली जात आहे़ अद्याप कोणाला तशी काही लक्षणे नसल्याचे समोर आले आहे़

टॅग्स :Civil lineसिव्हिल लाइनJalgaonजळगाव