शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
5
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
6
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
7
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
8
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
9
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
11
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
12
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
13
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
14
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
15
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
16
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
17
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
18
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
19
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
20
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत

प्लक्झरी बस उलटून १४ प्रवासी जखमी

By admin | Updated: January 14, 2017 00:59 IST

भोकरबारी धरणाजवळील घटना : कुटीर रुग्णालात उपचार, अपघात होताच चालक-सहचालक फरार

ाारोळा : समोरून  येणाºया वाहनाला साईड देताना वाहनावरील ताबा सुटल्याने, लक्झरी बस रस्त्याखाली उतरून झाडाला धडक देत खड्यात पलटी झाली. यात बसमधील १४ प्रवाशी जखमी झाले. हा अपघात अमळनेर-पारोळा रस्त्यावरील भोकरबारी धरणाजवळ आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर चालक, सहचालक वाहन सोडून फरार झाले.अमळनेरहून पारोळ्याकडे खाजगी लक्झरी बस (एमएच १९-वाय. ७०७१)  येत होती. भोकरबारी फाट्याजवळून चालकाने लक्झरी बस सहचालकाला (क्लिनर) चालविण्यास दिली.  त्याने थोड्या अंतरापर्यंत बस चालवली. समोरून येणाºया वाहनाला साईड देण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या खाली उतरत, झाडावर जाऊन आदळली. त्यानंतर दोन-तीन पलट्या खात २० ते २५ फूट खड्यात गेली. ही बस झाडावर आदळली नसती,तर बस जवळच असलेल्या विहिरीत पडली असती.प्रवाशांचा आक्रोशबसमध्ये जवळपास २० ते २२ प्रवाशी होते. बस पलटी होताच, जखमी महिला, पुरुष, लहानमुले यांनी आक्रोश केला हाता.बस पलटी होताच आजुबाजुच्या शेतात काम करणाºया शेतकरी तसेच डॉ. गोपाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना खाजगी गाडीतून कुटीर रुग्णालयात पोहचविले. यावेळी बुलढाणा अर्बन बॅँकेचे विभागीय व्यवस्थापक रमेश पवार यांनी स्वत:च्या गाडीतून जखमींना रुग्णालयात पोहचविले. घटनास्थळी चप्पल, पिशव्या, यांचा खच पडलेला होता.कुटीरमध्ये उपचारजखमींवर कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ. तुषार रनाळे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. राहुल जैन, आदींनी प्रथमोपचार केले. आठ जखमींना धुळ्याला हलविलेया अपघातातील कमलाबाई सोनवणे, नामदेव भोई, गणेश निकम, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, वेणूबाई जगताप, राजेंद्र पाटील, समाधान पाटील यांना रोशन पाटील, ईश्वर ठाकूर, दीपक सोनार यांनी रुग्णवाहिकेतून धुळ्याला हलविले.महामंडळाच्या कर्मचाºयांचे दुर्लक्षअपघात स्थळापासून त्याचवेळी एस.टी.महामंडळाच्या बसेस् गेल्या. मात्र महामंडळाच्या चालकांनी बस थांबविण्याचे सौजन्य दाखविले नाही. एस. टी.महामंडळाचे तिकीट तपासणी पथकाचे अधिकारीही घटनास्थळावरून गेले मात्र त्यांनीही या जखमींकडे दुर्लक्ष केले.चालक-सहचालक फरारबस झाडावर आदळताच, चालक, सहचालकाने बसमधून उड्या घेत अपघातस्थळावरून पळ काढला.पोलिसांतर्फे पंचनामाअपघात झाल्यानंतर बºयाच वेळाने पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करण्याचे काम केले. मात्र रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झालेली नव्हती.                (वार्ताहर)अपघातात कमलाबाई राजू सोनवणे (५०), देवयानी राजू सोनवणे (१७),सागर राजू सोनवणे (१३, सर्व  रा.जळगाव), राजेंद्र नामेदव पाटील (३५), चुनीलाल हरि पाटील (४५, रा.वेल्हाणे, ता.पारोळा), नामदेव छगन भोई (२५, रा. उत्राण,ता. एरंडोल), गणेश प्रल्हाद निकम (३०, पाळधी), समाधान रमेश पाटील (१७), गुलाब बाळू पाटील (१९), महेंद्र शंकर पाटील (३०, दोन्ही रा.भोकरबारी),वेणुबाई गणपत जगताप (७०,पारोळा), निकिता कैलास ठाकरे (१९), अशोक दगडू मोरे (४३,वावडे,ता.अमळनेर), राजेंद्र निंबा पाटील (पारोळा) यांचा समावेश आहे.