शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १८ गुन्ह्यांमधील १३९ ग्रॅम सोनसाखळी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:56 IST

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : एलसीबीची कामगिरी

जळगाव : शहर व इतर जिल्ह्यात महिलांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून आकाश ज्ञानेश्वर सूर्यवंशी (रा.प्रजापत नगर), अमोल उर्फ रामेश्वर राजेंद्र अहिरे (विठ्ठल पेठ) व सागर राजेंद्र चौधरी (रा.जुने जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील १३९ ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.सोनसाखळी चोरल्यानंतर त्या कमी किमतीत विकत घेणारा सराफ व्यावसायिक दीपक शिवराम भडांगे (रा.ज्ञानदेव नगर) यालाही आरोपी करण्यात आले आहे, दुसरा एक सराफा मोहन घाटी हा मयत झालेला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेल्या तीन महागड्या दुचाकीही जप्त करण्यात आलेल्या आहेत. २०२० या वर्षात अखेरच्या महिन्यात सोनसाखळी चोरीच्या तब्बल २० घटना घडल्या होत्या व त्यापैकी एकही घटना उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नियुक्त केले होते. आकाश व सागर हे सोनसाखळी चोरी करुन पुण्यात पलायन करीत असल्याची माहिती कॉन्स्टेबल परेश महाजन या कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार पोलीद निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी उपनिरीक्षक सुधाकर लहारे, रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय देवराम पाटील, हवालदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील यांचे पथक पुण्याला रवाना केले होते. सलग दोन महिने पाळत व पुरावे गोळा करुन या पथकाने पुण्यातून आकाश याला अटक केली.दोघांना जळगावातून अटकआकाश याला ताब्यात घेतल्यानंतर सोनसाखळी चोरीची कबुली देतानाच अमोल व सागर या दोघांनाही सोबत तिघांनी जळगाव, पुणे, कराड, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा व मुक्ताईनगरात चोरी केल्याचे सांगून चोरलेले दागिने जळगावातच सराफाकडे कमी किमतीत विक्री केल्याची कबुली दिली. त्यावरुन सहायक फौजदार अशोक महाजन, सुनील दामोदरे, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, अनिल देशमुख, संदीप पाटील, सुनील दामोदरे, राहूल पाटील, संदीप साळवे, पंकज शिंदे, योगेश वराडे, किरण चौधरी, विनायक पाटील, मुरलीधर बारी, सविता परदेशी, महेश महाजन, गोरक्षनाथ बागुल,जयंत चौधरी व अशोक पाटील यांच्या पथकाने अमोल व सागर यांचा शोध घेऊन अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव