शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

बनावट एटीएम कार्डद्वारे परस्पर १३ हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 23:31 IST

बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देधानोऱ्यातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव  :  बनावट एटीएम कार्ड तयार करून तरूणाच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे उघडकीस आला आहे. तरूणाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , निलेश अजबराव पाटील (३३ रा. टाकळी प्र.चा. भडगाव रोड ता.चाळीसगाव) या तरूणाने चाळीसगाव शहरातील एका खासगी बँकेत खाते आहे. १७ मे रोजी सकाळी ८.४० ते ८.४१ वाजेच्या दरम्यान बँकेच्या खात्याशील जोडलेल्या डेबीट कार्डचे बनावट नवीत कार्ड तयार करून निलेश पाटील यांच्या खात्यातील १३ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

धानोऱ्यातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

धानोरा, ता. चोपडा :  ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात  असलेले एटीएम चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला.  ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सकाळी लक्षात आली.  एटीएम न फुटल्यामुळे चोरांच्या हाती काही लागले नाही; पण  एटीएमचे काही प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अडावदचे एपीआय किरण दांडगे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. दीड वर्षातील ही दुसरी घटना आहे. हे एटीएम दीड वर्षात चोरट्यांनी दोन वेळा फोडले. दोन्ही वेळा रक्कम चोरण्यात असफल झाले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :JalgaonजळगावChopdaचोपडाChalisgaonचाळीसगावatmएटीएमThiefचोर