शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : वडिलांच्या जाचास कंटाळून १३ वर्षीय मुलीची आत्महत्या, पारोळा तालुक्यातील राजवड येथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:23 IST

वडीलांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देमुलीच्या वडिलास अटकदुर्दैवी घटना

पारोळा, जि. जळगाव - तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथे छकुली सुरेश देवरे या १३ वर्षीय मुलीने वडील दारूच्या नशेत नेहमी शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असल्याने कंटाळून ३० रोजी दुपारी दोन वाजता विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.आदर्श गाव राजवड येथील सुरेश गंभीर देवरे यांची १३ वर्षीय मुलगी छकुलीला घरातील वारंवार शिवीगाळ व मारहाण करून तिला सुरेश देवरे हे त्रास देत होते. त्या छळाला कंटाळून छकुलीने ३० जून रोजी दुपारी दोन वाजता राहाते घरात काहीतरी विषारी पदार्थ सेवन केले. शेजाऱ्यांना सदर मुलगी पडलेली दिसल्याने तिला सायंकाळी साडेपाच वाजता १०८ रुग्णवाहिका मागवून तिला पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा सहा वाजता मृत्यू झाला. याबाबत छकुलीचे मामा सुनील रामा पटाईत रा. कृष्णापुरी बहिरम नगर पाचोरा यांनी पारोळा पो. स्टे. ला फिर्याद दिल्यावरून मुलीचे वडील सुरेश देवरे विरुद्ध मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सुरेश देवरे यास अटक करण्यात आली आहे.गावात लग्न होते त्यामुळे सुरेशने छकुलीला दोन पोळ्या टाकून द्यायला सांगितले असता तिने त्या बनवून दिल्या नाहीत म्हणून मी दोन चापट मारल्याचे सुरेशने सांगितले. सुरेशची पत्नी ७ वर्षांपूर्वी मरण पावली आहे तिला तीन मुली असून मोठीचे लग्न झाले आहे. दुसरी ही छकुली होती तर तिसरी ११ वर्षांची परी ही मावशीकडे राहते. घरात छकुली तिचे आजी - आजोबा व वडील असे राहत होते.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव