शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:42 IST

जळगाव रेल्वे अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे

Jalgaon Train Accident: जळागाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर माहेजी ते परधाडे स्थानकांदरम्यान बुधवारी मोठा रेल्वे अपघात घडला. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरल्याने घाबरून प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने बाहेर आलेल्या प्रवाशांना धडक दिली. त्यापैकी १२ प्रवाशांचा जागीच तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला. तर जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातादरम्यान, अनेकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं आहे. अशातच लखनऊवरुन मुंबईला येत असलेल्या सूनेनं सासूचा मृतदेह रेल्वे रुळाखाली दिसल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना धक्का बसला.

लखनऊहून मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे १३ जणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. अनेक प्रवाशांनी घाबरून ट्रेनची चेन ओढली आणि अचानक खाली उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळावर येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. या घटनेत १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघात एवढा भीषण होता की, काही ठिकाणी मानवी अवयव आणि मृतदेह रुळावर विखुरले होते. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लखनऊहून पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना झाली होती. बुधवारी दुपारी ४.४२ वाजता ही ट्रेन मुंबईपासून ४२५ किमी अंतरावर असलेल्या जळगावच्या पाचोरा स्थानकाजवळ पोहोचली तेव्हा इंजिनलगतच्या डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. आरडाओरड होताच घाबरलेल्या प्रवाशांनी तत्काळ गाडी थांबवली आणि डब्यातून उड्या मारल्या. त्याचवेळी बंगळुरूहून दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने रूळावर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. त्यात काही प्रवासी  चिरडले गेले, काही दूर फेकले गेले. रुळांवर झालेल्या मृत्यूच्या या तांडवानंतर आता अपघाताचे साक्षीदार आणि मृतांच्या नातेवाईकांनी आपली कहाणी सांगितली आहे.

लखनऊवरुन मुंबईला येणाऱ्या एका महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तिच्या सुनेने त्यावेळी घडलेला प्रसंग सांगितला. "मला दुपारी आई म्हणाली होती की तू झोपून जा. मग अचानक म्हणाली इथून पळ बोगीत आग लागली आहे. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे मीही दुसऱ्या बाजूच्या दरवाजाने खाली उतरले. तिथं आग किंवा धूर काहीच नव्हतं. पण शेजारच्या रुळावर पाहिलं तर आईचा मृतदेह होता," असं मृत कमला भंडारी यांची सून राधा भंडारी यांनी सांगितले.

घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये असलेल्या जगमोहन पासवान यांनी सांगितले की, "आमच्या कोचमध्ये विक्रेते होते, त्यांच्यापैकी एकाने आरडाओरडा केला की काही  कोचला आग लागली आहे काही सेकंदात ट्रेन थांबली आणि लोक दरवाजाकडे धावले. माझे नातेवाईक उत्तम पासवान यांनीही ट्रेनमधून उडी मारली आणि त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. उत्तमप्रमाणेच कोचच्या उजव्या बाजूने उडी मारणारे अनेक जण जखमी झाले आणि अनेकांना जीव गमवावा लागला. मी डाव्या बाजूने उतरलो आणि त्यामुळे इतरांप्रमाणेच वाचलो." 

टॅग्स :Jalgaonजळगावcentral railwayमध्य रेल्वेAccidentअपघात