शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर कुटुंबाकडील १३ लाखाच्या घरफोडीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 10:48 IST

एलसीबीने केली दोघांना अटक : पावणे चार लाखाच्या रोकडसह दुचाकी हस्तगत; डॉक्टर कुटुंब होते क्वॉँरटाईन

जळगाव : कुटुंब प्रमुख डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण कुटुंब भुसावळात क्वॉरंटाईन झाल्याची संधी हेरुन बंद घराचे कुलुप तोडून झालेल्या १३ लाखाच्या धाडसी घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पर्दाफाश केला आहे. आकाश सुरेश मोरे (२५, रा.घोडेपीर नगर, भुसावळ) व शेख महेबूब शेख इमाम (६०,रा. दिनदयाळ नगर, भुसावळ) या दोघांकडून ३ लाख ६६ हजार ३०० रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.भुसावळ शहरातील रजा नगरात डॉक्टर दाम्पत्य वास्तव्यास आहेत. २४ मे रोजी कुटुंब प्रमुख डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे त्यांना त्याच दिवशी भुसावळातील कोविड रुग्णालयात तर कुटुंबातील डॉक्टर पत्नी व मुलांना एका विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यामुळे डॉक्टर दाम्पत्याच्या घराला कुलुप होते. ३१ मे रोजी डॉ. व मोठ्या मुलाचा कोरानाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दोघांची रुग्णालयातून सुटका झाली तर लहान मुलाचा अहवाल प्रलंबित असल्याने डॉ. या मुलाजवळ थांबल्या तर मोठा मुलगा काकांकडे गेला होता.२ जून रोजी लहान मुलाचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वजण डॉ. यांच्या मोठ्या भावाच्या घरी गेले. तेथून मोठा मुलगा घरी गेला असता त्याला घराचे कुलुप उघडे, खिडकीचे लोखंडी ग्रील उचकावलेले व घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ.यांनी घरी येऊ पाहणी केली असता १० लाख ९० हजार ९०० रुपये रोख व दागिने असा १३ लाखाचा ऐवज चोरी झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी डॉक्टरांची पत्नी यांच्या फिर्यादीवरुन भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.पाच जणांची टोळी,चार फरारमिळालेल्या माहितीनुसार या पथकाने आकाश मोरे याच्या घरातूनच मुसक्या आवळल्या. घर झडतीत त्याच्याकडे २ लाख ८६ हजार ४०० रुपये व दुचाकी आढळून आली. खाकी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच या गुन्ह्यात शेख दाऊद शेख महेमूद, (रा.दीनदयाळ नगर) अनिस शेख रशीद ,अल्तमस शेख रशिद (रा.जाम मोहल्ला) व जहीर (रा मुस्लिम कॉलनी) यांचाही सहभाग असल्याचे सांगितले. या पाच जणांनी मिळून घरफोडी केली व बाकीचे पैसे वाटणी करुन फरार झाल्याची माहिती दिली, त्यातील दाऊद याने घरी वडीलांकडे काही रक्कम ठेवली असल्याचे त्याने चौकशी सांगितले.त्यानुसार पथकाने आकाश याला घेऊन दाऊद याचे वडील शेख महेबूब शेख इमाम यांच्याकडे चौकशी केली, मात्र सुरुवातीला नकार देणाऱ्या इमाम यानेही खाकीच्या हिसक्यापुढे नमते घेत घराल लपवून ठेवलेले ७९ हजार ९०० रुपये काढून दिले. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात इमाम यालाही आरोपी केले आहे. उर्वरित चौघांच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी सुरु आहे.मुख्य सूत्रधारच लागला हातीया गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बाजार पेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. चोरीचा प्रकार उघड झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे रणजीत जाधव व युनुस शेख भुसावळात ठाण मांडून असताना त्यांना खबºयामार्फत डॉक्टर दाम्पत्याकडील घरफोडी शहरातील पाच जणांच्या टोळीने केल्याची माहिती मिळाली. त्यातील नावे निष्पन्न केल्यानंतर आकाश सुरेश मोरे हा भुसावळातच असून त्याच्याकडे काही रोकडदेखील असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सहायक फौजदार राजेंद्र का पाटील, हवालदार अनिल इंगळे,शरीफ काझी,रमेश चौधरी, युनुस शेख, संतोष मायकल, रणजित जाधव, राजेंद्र पवार यांचे पथक नेमून तातडीने भुसावळला रवाना केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव