जळगाव : मोफत व सवलतीच्या दरातील धान्य मिळविण्यासाठी तयार केलेले राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्याने अडीच हजार कोटींच्या धान्याची बचत झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगावत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.रेशन दुकानातील धान्य पॉस मशिनद्वारे वितरीत करण्यास सुरुवात झाल्याने गैरव्यवहाराला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध आणला आहे. रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये देखील वाढ केली. पॉस मशिनद्वारे बँक मित्र ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार स्थानिक बँकेसोबत करार केल्यानंतर हा उपक्रम राबविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मोफत धान्य घेण्यासाठी तयार केलेले ११ लाख बोगस रेशन कार्ड रद्द केले आहे. त्याद्वारे ११ टक्के धान्याची बचत होऊन शासनाचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये वाचल्याचे त्यांनी सांगितले. रेशनचा गैरव्यवहार थांबल्याने आम्ही ९९ लाख लोकांना रेशनचे धान्य देऊ शकतो.
राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द : गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:28 IST
मोफत व सवलतीच्या दरातील धान्य मिळविण्यासाठी तयार केलेले राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्याने अडीच हजार कोटींच्या धान्याची बचत झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगावत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द : गिरीश बापट
ठळक मुद्देपॉस मशिनमुळे अडीच हजार कोटीच्या धान्याची बचतपॉस मशिनद्वारे बँक मित्र संकल्पनेची अंमलबजावणी९९ लाख लोकांना रेशनचे धान्य देण्याची क्षमता