शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काटेरी झुडपांमध्ये साठवून ठेवलेली २०० ब्रास वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:58 IST

लिलाव करणार

जळगाव : काटेरी झुडपे टाकून निमखेडी शिवारात लपवून ठेवलेली तब्बल २०० ब्रास वाळू गुरुवारी महसूलच्या पथकाने जप्त केली. सकाळी तपासणीदरम्यान ही वाळू आढळून आली. वाळूचा मालक पुढे आलेला नसून या वाळूचा लिलाव करण्यात येईल अथवा शासकीय कामांसाठी ती देण्यात येईल, असे सांगण्यात आले.जिल्ह्यात अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल पथकाच्यावतीने तपासणी सुरू असून गुरुवारी सकाळी मोहाडी, दापोरा, शिरसोली तसेच निमखेडी या भागात तपासणी करीत असताना निमखेडी गावापासून काही अंतरावर एका ठिकाणी काटेरी झुडपे टाकून वाळू लपवून ठेवली असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी पाहणी केली असता २५ ते ३० साठे आढळून आले.पंचनामा व इतर प्रक्रियेदरम्यान साठा गायब होऊ शकतो, त्यामुळे दक्षता म्हणून पथकाने तत्काळ हा साठा उचलून जिल्हाधिकारी परिसरात आणून ठेवला.जवळपास २०० ब्रास हा साठा असून प्रांताधिकाऱ्यांकडून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन या वाळू साठ्याचा एकतर लिलाव करण्यात येईल अथवा शासकीय कामांसाठी ती देण्यात येईल, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.दरम्यान, महसूल पथकाकडून कारवाई सुरू असली तरी अवैध गौण खनिज वाहतूक सुरूच असल्याचे आढळून येत आहे. गुरुवारी हा साठा जप्त करण्यापूर्वी मुरुमाची अवैध वाहतूक करणारे दोन डंपर पकडण्यात येऊन त्यांना एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव