शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिद्द असणाऱ्या युवकांनी नवनिर्माण घडवावे : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:56 IST

महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र, मराठवाड्याच्या विकासासाठी काही तरी नवीन करून दाखविण्याची जिद्द असणा-या युवकांनी विकासाचे मुद्दे घेऊन आपल्या सोबत आल्यास त्यांना आपण पदाच्या माध्यमातून संधी देऊ, निवडणुका या गमतीचा विषय नसून, यावेळी जागृत राहून योग्य त्यांना मतदान केल्यासच महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल असे प्रतिपादन नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांनी केले.रविवारी त्यांच्या उपस्थितीत येथील गुरूगणेश भवनमध्ये कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केल. आजपर्यंत आपण केवळ चुकीच्या मुद्यांभोवती फिरत राहिलो. निवडणुका आल्यावर पैसा, जेवण आणि दारू एवढे मिळाले म्हणजे युवकांनी ती मोज-मजा वाटते. परंतु ही चुकीची धारण बाजूला ठेवा, समाजाच्या राज्याच्या आणि विशेष करून मराठवाड्याच्या विकासासाठी नेमके काय केले पाहिजे हे आधी ठरवा. ते ठरवून हे करणे गरजेचे आहे, याच संदेश मला पाठवा, योग्य त्या प्रस्तावांची आपण जरूर दखल घेऊन त्यानुसार संबंधिताला संधी देऊ असे सांगून ठाकरे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार राजकारण करत आहे. आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी मिळते. येथे किती कमी संधी आहेत हे आपण जाणून आहात. मात्र त्याची वस्तुनिष्ठ माहिती दिली जात नसल्याने युवकांची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, गजानन गीते, खटके आदींसह पानसरे, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.मेळाव्यास जिल्हाभरातून नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते.निवडणुका आल्या की, राम मंदिरनिवडणुका आल्या की, भाजपला राम मंदिराचा मुद्दा आठवतो. गेली चार वर्षे बहुमताची सत्ता असताना ते का केले नाही, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवायची आणि त्याचा लाभ मतपेटीसाठी करून घ्यायचा ही भाजपाची रणनिती असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे