शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:43 IST

जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची निवड झाल्याची घोषणा युवक काँग्रेस निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मीना यांनी गुरूवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच पार पडली असून, जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख यांची निवड झाल्याची घोषणा युवक काँग्रेस निवडणूक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मीना यांनी गुरूवारी येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात केली.जालना जिल्हा युवक काँग्रेसची दोन दिवसीय निवडणूक पार पडली. या दोन दिवसामध्ये जिल्ह्यातील युवक पदाधिकाºयांनी आपआपल्या भागामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती. या निवडणुकीचा निकाल गुरूवारी निवडणुक निर्णय अधिकारी अनिरूद्ध मिना यांनी जाहीर केला.या निवडणुकीत जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून परतूर येथील इब्राहिम कायमखानी, जालना शहरातील शेषराव जाधव, रवींद्र गाढेकर, सतीश गोरे यांची निवड झाली आहे. तर जालना विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून देवराव डोंगरे, शेख सईद, नवीद अख्तार यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.बदनापूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून सेलगाव येथील जावेद बेग यांची निवड करण्यात आली आहे. भोकरदन विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून जुनेद खान (जाफ्राबाद) यांची निवड झाली आहे तर महेश दसपुते यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. घनसावंगी विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अश्विनी सातपुते यांची निवड झाली आहे तर कैलास कोरडे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली आहे. परतूर विधानसभा युवक काँग्रस अध्यक्षपदी सुरेश वाहुळे यांची निवड झाली आहे. युवक काँग्रेस निवडणुकीची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होती. या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे.युवक काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिका-यांचा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या निवास्थानी शाल आणि पुष्पहाराने जोरदार स्वागत केले. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, युवक काँग्रेसचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड.संजय खडके, मंठा तालुकाध्यक्ष नीळकंठ वायाळ, वैभव उगले, शिवराज जाधव, ईरशाद कुरेशी, मोहन इंगळे, जाफराबाद अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष जहीर खान, सय्यद खालेद, राज महंमद, जितेंद्र गाढेकर, मो. इब्रान, सलीम मणियार, शेख कलीम, अन्नू भाई, शेख अजीम, गोपाल चित्राल, सागर ढक्का आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान या झालेल्या निवडीबद्दल पदाधिका-यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक