शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल बाळगणारा युवक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:55 IST

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने (एडीएस) जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका महाविद्यालयीन युवकाला दरोडा प्रतिबंधक पथकाने (एडीएस) जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी बदनापूर शहरातील वाल्ला रोडवर करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऋषिकेश राजू जऊळकर (२१ रा. शेंद्रा एमआयडीसी गंगापूर जहाँगीर अष्टविनायक वसाहत ता. औरंगाबाद) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. जऊळकर याच्याकडे गावठी पिस्तूल असून, तो औरंगाबादहून बदनापूर मार्गे उज्जैनपुरीकडे बसने जात असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पो.नि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सोमवारी सकाळी बदनापूर येथे सापळा रचला. त्यावेळी खाटिक गल्ली जवळून वाल्ला रोडने पायी जाणा-या ऋषिकेश जऊळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. अधिक चौकशी केल्यानंतर पिस्तूल मित्राचे असल्याचे त्याने सांगितले.या प्रकरणी पोहेकॉ ज्ञानदेव नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ऋषिकेश जऊळकरसह दोघाविरूध्द गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि यशवंत जाधव, पोहकॉ ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण यांच्या पथकाने केली.सोशल मीडियावर गावठी पिस्तुलासह फोटो टाकण्यात आले होते. सोशल मीडियावरील पोस्टवरून हे पिस्तूल प्रकरण पोलिसांच्या समोर आले. माहिती गुप्त ठेवून पोलिसांनी या पिस्तुलाचा छडा लावला असून, एका युवकालाही ताब्यात घेतले आहे. तर दुस-या युवकाचा शोध लवकरच घेतला जाईल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीसArrestअटक