शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गाव झकास, दारूने तरुण पिढी भकास..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:41 IST

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ गावामध्ये खुलेआमपणे अवैधरीत्या देशी दारुविक्री होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ गावामध्ये खुलेआमपणे अवैधरीत्या देशी दारुविक्री होत आहे त्यामुळे गाव झकास पण देशी दारुमुळे तरुणपिढी भकास अशी ओळख आता परिसरात गावाची होत आहे.जळगाव सपकाळ हे गाव परिसरात गावाला पूर्वीपासून वारकरी सांप्रदायाचा भाग म्हणून ओळख होती, गावातील सर्व जाती - धमार्तील ग्रामस्त एकोप्याने व गुण्या गोविंदाने राहत असे त्यामुळे गावाचा चेहरा म्हणून वारकरी सांप्रदाय असल्याने गाव झकास होते. परंतु कालांतराने तरुणपिढी व्यसनाकडे वळत असल्याच्या कारणाने गावातील नागरिकांनी ग्रामसभेव्दारे चार वर्षात तीनवेळा दारुबंदीचा ठराव घेऊन संमत करण्यात आला व गावातील अवैध दारुबंदीसाठी काही महिन्या पूर्वी हद्दपार झाली होती, माञ आता पारध पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही दारू विक्री सुरू आहे. दारुबंदीचा ठराव घेतलेल्या गावांमध्येही जोरात अवैध दारुविक्री सुरु असून, याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी गावातील महिलांनी पारध पोलीसासह जिल्हाधिका-यांकडे नऊ जानेवारीला केली होती. मात्र प्रशासनाने कारवाई न केल्याने गावांमध्ये अवैधरीत्या दारुचीविक्री सुरुच आहे.शासनाचा निर्णय व ग्रामपंचायतीचा दारुबंदीचा ठराव घेतल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर उपाययोजनेची जबाबदारी प्रशासन व पोलीस विभागाची आहे. माञ पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.संबंधित गावातील अवैध दारूची दुकाने ही गावातील फाट्यावर, शाळा परिसरात रस्त्याच्या कडेला चालू आहेत. एकूणच दारूबंदीसाठी पोलीस आणि जिल्हाधिका-यांना निवेदन दिले असले तरी, उत्पादन शुल्क विभागा कडे ग्रामपंचायतचा ठराव देऊन मतदान करण्याची मागणी करणे गरजेचे आहे. हे मतदान झाल्यावरच गावात दारू बंदी अंमलात येऊ शकते असे पोलिसांनी सांगितले. मात्र तसेच होत नसल्याने पोलिसांकडून अपेक्षा करणे चुकीचे असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :liquor banदारूबंदीSocialसामाजिक