शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रामखेडा येथे युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 01:14 IST

स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. संतोष हनुमान कुरधने (२२) असे मयताचे नाव आहे.मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून खून करण्यात आला.बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली.यामुळे घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, एडीसचे यशवंत जाधव, यांच्यासह बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. याचा तपास तातडीने लावणार असल्याचे यशवंत जाधव म्हणाले.या तरुणावर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. तेव्हा बदनापूर पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.यामुळे खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी