शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजासमोरील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:31 IST

माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.

ठळक मुद्देकैलास गोरंट्याल : समता परिषदेच्या मेळाव्याचे साक्षीदार

जालना : तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथे परिषदेचा पहिला मेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. या घटनेचा मी आणि डॉ. पंडितराज धानुरे हे साक्षीदार आहेत. माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, समाजाने पाठींबा दिल्याने विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे प्रतिपादन कैलास गोरंट्याल यांनी केले.जालना विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांना सावता परिषद आणि समता परिषदेच्या बैठकीत पाठींबा देण्यात आला. गोरंट्याल यांना मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील १७ गावातील सावता आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जालना येथील प्रचार कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी आमदार शकुंतला शर्मा, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा खरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत गोरंट्याल यांना विजयी करण्याचा निर्धार केला.बैठकीस नितीन इंगळे, सुभाष गिराम, एकनाथ घोलप, राम गिराम, बबलू बडदे, एकनाथ राऊत, दिलीप गिराम, गणेश खरात, गणेश तिडके, गजानन खरात, अरुण घडलिंग, गोविंद खरात यांच्यासह सावता परिषद, समता परिषदेसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ. विशाल धानुरे यांनी केले.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस