शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवा, मार्केट मी उपलब्ध करून देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:45 AM

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. ...

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : खाजगी कंपन्यांमुळे सरकारची पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

जालना : महाराष्ट्रात नव्हे देशात भरविले गेले नाही, असे प्रदर्शन शेतकºयांसाठी जालन्यात होत आहे. शेतीला व्यवसायाची जोड द्यायला हवी. मराठवाड्यात खूप कमी दूध उत्पादन होते. याकडे संधी म्हणून शेतकºयांनी पाहावे. तुम्हाला मार्केटची चिंता असेल तर काळजी करू नका. तुम्ही दूध उत्पादन वाढवा, मी मुंबईत मार्केट उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही युवा शिवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली. सरकारच्या पीक विमा योजनेत खाजगी कंपन्या शिरल्याने ती अजूनही शेतकºयांपर्यंत पोहोचलेली नाही, असेही ठाकरे म्हणाले.मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप व अनुदानित गो-शाळांना गौरवपत्रांचे वितरण महापशुधन एक्स्पोत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही कळत नाही. पण, शेतकºयांचे अश्रू पुसायला हवेत हे निश्चित कळते. एरवी मार्च-एप्रिलमध्ये येणारा दुष्काळ यंदा आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्येच धडकला. या संकट काळात मिळेल तितकी मदत कमीच वाटते. पण, खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. अर्जुन खोतकर यांनी सजा वा मजा म्हणून खात्याकडे न बघता खात्याच्या माध्यमातून जनसेवेचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.१ लाख दुभती जनावरे वाटणार - खोतकरमहाराष्ट्रातील एकूण दुधापैकी ७३ टक्के दुधाचा पुरवठा प. महाराष्ट्रातून होतो. मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्राचा वाटा १७ टक्केच आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. आगामी काळात १ लाख जनावरे शेतकºयांना देऊ, अशी घोषणा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. खोतकर म्हणाले, ‘दानवे, पशुसंवर्धन विभाग ही शिक्षाच होती. पण, अधिकारी, कर्मचाºयांनी भारतभ्रमण करून हे प्रदर्शन घडवून आणले.’एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतंमी इस्रायलमध्ये गेलो होतो. तेथे मुद्दाम पशुपालन बघितले. एका वाड्यात हजार जनावरे होती आणि दारात फक्त एक माणूस. मी त्यांना विचारलं किती माणसं जनावरे सांभाळतात, त्यावर ते म्हणाले फक्त एक माणूस. ते मी जाणून घेतले, अशी आठवण भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितली.तिथला माणूस म्हणाला, वाड्याचा दरवाजा उघडल्यावर एक सायरन वाजवला जातो. सर्व जनावरे बाहेर जातात. अडीच फूट गवतात दोन तास चरल्यानंतर पुन्हा सायरन वाजवला जातो. जनावरे पाणी पितात. तिसºया सायरनला जनावरे पुन्हा वाड्यात येतात. आपल्याकडे एक जनावर सांभाळायचे म्हटले तरी लोढणं बांधावं लागतं, असे सांगताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीArjun Khotkarअर्जुन खोतकरAditya Thackreyआदित्य ठाकरे