शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

मल्लांचे शहर आता सर्व खेळांसाठी प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:29 IST

एके काळी मल्लांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची ओळख आता फुटबॉल, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, क्रिकेटपटूंचे शहर म्हणून होते आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहराने व जिल्ह्याने दिले आहेत.

राजेश भिसे।लोकमत न्यूज नेटवर्कएके काळी मल्लांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहराची ओळख आता फुटबॉल, बुद्धिबळ, खो-खो, कबड्डी, क्रिकेटपटूंचे शहर म्हणून होते आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या शहराने व जिल्ह्याने दिले आहेत. त्यातच फुटबॉलसह इतर विविध खेळांमुळे नवीन पिढीसाठी वातावरण पोषक होत आहे, ही समाधानाची बाब मानली पाहिजे.व्यायाम, विविध प्रकारचे खेळ निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असतात. आखाडा आणि तालमींसाठी जालना हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होते. शहरात दादूराम वस्ताद, भोप्या वस्ताद भगत आखाडा, कैलास तालीम, देवाप्पा वस्ताद तालीम, विजय हनुमान तालीम इ. मल्ल व कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध होत्या. मराठावाडा, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा या शहरात घेण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरी, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा घेऊन राज्यातील प्रसिद्ध मल्लांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धांमुळे तरुणांना व्यायाम आणि क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. कुस्तीसाठी कोल्हापूरनंतर जालना शहराचे नाव घेतले जात असे. याबरोबरच शरीर सौष्ठव, बुद्धिबळ, फुटबॉल, विटी-दांडू, खो-खो, कबड्डीपटूही या शहरात घडले आहेत. विविध क्रीडा स्पर्धा शहरात घेऊन नवीन खेळाडू तयार व्हावेत, यासाठी माजी आ. कैलास गोरंट्याल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, स्व. अंकुशराव टोपे, आ. राजेश टोपे, रमेश शेळके, जे. एस. कीर्तीशाही, विवेक निर्मळ, डॉ. दयानंद भक्त, राजेश राऊत, फेरोज अली, हरेष तलरेजा, राजू काणे, बाळासाहेब देशमुख, प्रशांत नवगिरे आदींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.डॉ. दयानंद भक्त यांनी गतवर्षीच राज्यस्तरीय ११ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा घेऊन स्थानिक मुलांना संधी मिळवून दिली. आगामी काळात ९ वर्षांखालील वयोगटासाठीही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय विटीदांडू स्पर्धा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली. या स्पर्धेमुळे केवळ ग्रामीण भागाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणा-या या खेळाकडे शहरी तरुणांनी लक्षणीय सहभाग नोंदवला आहे.सध्या शहरासह जिल्ह्यात फुटबॉल फिवर तरुणाईमध्ये दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धांसाठी ज्युनिअर आणि सबज्युनिअर संघ नांदेड व पनवेल येथे रवाना झाला आहे. क्रीडापटू घडविण्याच्या दिशेने पावले उचलली जात असली तरी त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. फुटबॉल, क्रिकेट या खेळांसाठी मैदान उपलब्ध नाही.राज्य वा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत सहभाग घेण्यासाठी त्याच दर्जाचे साहित्य आणि सुविधा असणे गरजेचे आहे. या मिळाल्या तरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू या शहरात घडू शकणार आहेत. विविध क्रीडा संघटनांचा पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधी व सजग नागरिकांचे सामूहिक प्रयत्न झाले तरच क्रीडा क्षेत्रासाठी पोषक वातावरण होऊ शकणार आहे. ते होतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.