शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिनिंगमध्ये काम करताना स्कार्फ बेल्टमध्ये अडकून फास बसला, महिला कामगाराचा मृत्यू

By महेश गायकवाड  | Updated: June 19, 2023 15:16 IST

रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता

- बद्रीनाथ मतेतीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरालगत असलेल्या शहागड रोडवरील पूनम जिनिंगमध्ये सोमवारी सकाळी एका महिला कामगाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. जिनिंगमधील रुईच्या बेल्टमध्ये अडल्याने ही महिला गंभीर जखमी झाली होती. गळ्याला फास लागल्याने सदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती येथील कामगारांनी दिली. मालन नारायण यशलोटे, वय ४५, असे मयत महिला कामगाराचे नाव आहे.

तीर्थपुरी-शहागड रोडवर बीड येथील एका व्यापाऱ्याची जिनिंग अँड प्रेसिंग आहे. या ठिकाणी सोमवारी नेहमीप्रमाणे कापसाच्या गाठी तयार करण्याचे काम सुरू होते. जिनिंग हाऊसमधून कापसाची रुई बेल्टद्वारे प्रेसिंगसाठी जात असताना बेल्टवरून बाजूला पडणारी रुई वेचण्याचे काम मालन यशलोटे करत होत्या. रुईमधून निघणारी धूळ नाकातोंडात जाऊ नये म्हणून त्यांनी तोंडाला स्कार्प बांधला होता. हा स्कार्प व त्यानंतर साडी रुई वाहून नेणाऱ्या बेल्टमध्ये अडकली. त्यामुळे त्यांच्या तोंडाला व नाकाला मार लागला.

नाकातून रक्त आले होते व गळ्याला फास लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना ताबडतोब तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाकाडे यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले. जालना येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना मालन यशलोटे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तीर्थपुरीत हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाDeathमृत्यू