शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बसस्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:23 IST

बसस्थानक परिसरात मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली.

जालना : बसस्थानक परिसरात प्रवाशांची नजर चुकवून पर्स व बॅग मधील दागिने व मौल्यवान वस्तु चोरणाऱ्या एका महिलेला पोलीसांनी अबंड येथून अटक केली. मंदाकीनी गिन्यानदेव भोसले (रा. शारदा नगर अबंड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून १ लाख ६५ हजारांचे दागिनेही ताब्यात घेतली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पथकासह अंबड येथील शारदा नगर येथून मंदाकीनी  भोसले, सुरेखा पवार, सुरेखा काळे यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता, या महिलांनी जालना बसस्थानकावर २३ आॅगस्ट रोजी एका महिला प्रवाशी आपल्या पती व लहान मुलासह बसमध्ये चढत असतांना त्यांच्या पर्स मधील दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबूल दिली. तसेच सातारा येथे बसमध्ये महिला प्रवाशाचे पर्स चोरल्याची कबुल या महिलेने दिली आहे. सदर महिलेकडून तिने तिच्या साथीरांसह १ लाख ६५ हजार रुपयाचे दागिने हस्तगत केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजेंद्रसिह गौर, जयसिंह परदेशी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, रामेश्र्वर बघाटे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी यांच्यासह आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीArrestअटकJalanaजालना