कीर्तापूर ग्रामपंचायत आरक्षणावर आक्षेप
मंठा : तालुक्यातील कीर्तापूर येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद सलग २० वर्षापासून सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात येत असल्याचा आक्षेप खुशाल ईघारे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे घेतला आहे. सलगच्या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परवान्याचे वितरण
बदनापूर : शहरातील नर्मल क्रीडा व समाज प्रबोधन संस्थेच्या इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियातर्फे परवाना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिव डॉ. एम.डी. पाथ्रीकर, कार्यकारी संचालक डॉ. एम.डी. पाथ्रीकर, डॉ. देवेश पाथ्रीकर, प्राचार्य सुनील जायभाये, सय्यद नजाकत आदींची उपस्थिती होती.
तीर्थपुरी येथील सभेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बापूसाहेब बोबडे, अण्णासाहेब बोबडे यांनी शेतकरी सभेचे आयोजन केले होते. यावेळी पांडुरंग सोलनकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सभेस तीर्थपुरी व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.