शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा धाकलगावात हैदोस; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:33 IST

पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोंद्री : पिसाळलेल्या रानडुकराने गावात येऊन चार माणसांसह दोन गायींवर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.या घटनेत अश्मीरा जुमान पठाण या चार वर्षाच्या मुलीला तोंडात घेऊन पळून जात असतांना गावातील कुत्र्यांनी रानडुकरावर हल्ला करुन तिची सुटका केली. रानडुकराच्या धुमाकुळामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.रानडुकराने गावात दोन तास धुमाकूळ घातला यात भीमराव शेंडगे, शन्नोबी पठाण, त्यांची मुलगी अलबीरा जुमान पठाण (६), अश्मिरा जुमान पठाण (४) यांना चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत. अनेक नागरिकांवर हल्ला करून जखमी केले.गावापासून सर्व जंगल परिसर आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने हिंस्त्र प्राण्यांचा वावर परिसरात वाढला आहे. मंगळवारी सकाळी ऊसाच्या शेतातून पिसाळलेल्या रानडुकर गावात शिरले. भीमराव शेडगे हे घरात झोपले असता रानडुकराने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या हाताला चावा घेत त्यांना घराबाहेर ओढत आणले. त्यानंतर त्या रानडुकराने गावातील जुमान पठाण यांच्या कुटुंबियांवर हल्ला चढवला. त्यात तीनजण जखमी झाले, तर अन्य एका घटनेत रानडुकराने दत्ता देवडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाईला चावा घेऊन जखमी केले. तसेच भीमा गाढे यांच्यावरही हल्ला केला, त्यांच्या सर्तकतेमुळे ते त्यातून वाचले. चंद्रकांत गाडगे यांच्यावर देखील हल्ला केला असता त्यांनी तेथून पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले.गेल्या काही महिन्यांपासून रानडुकराचे थैमान या भागात वाढले आहे. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन त्यांचा पायबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांडून केली जात आहे.गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्या घेऊन रानडुकराचा पाठलाग सुरू केला असता, त्याने गावातील शालिकराम बाळा सराफ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या हातातील काठीने रानडुकराचा प्रतिकार केला. यावेळी सर्व गावकºयांनी मिळून त्या रानडुकरावर हल्ला चढवून त्याला ठार केले. त्यानंतर खड्डा करून त्याला गावाच्या बाहेर पुरले

टॅग्स :forest departmentवनविभागwildlifeवन्यजीव