लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून सालगड्याने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केला. परतूर तालुक्यातील यदलापूर येथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. संशयित पतीन पोलिसांनी अटक केली आहे.यदलापूर शिवारात भास्कर रनेर (४५) एका शेतात सालगडी म्हणून काम करत होते. भास्कर रनेर हा वारंवार पत्नीचा चारित्र्यावर संशय घेत असे. रविवारी मध्यरात्री अनैतिक संबंधाच्या संशयावरून संशयित भास्कर रनेर याने पत्नी राधाबाई हिच्या चेहऱ्यावर, पाठीवर दगडाने मारून खून केला. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संशयित भास्कर रनेर यास अटक केली. दरम्यान, आरापीची ही तिसरी पत्नी होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वाटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यदलापुरात संशयावरून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:07 IST