शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी प्रियकरासोबत पळून गेली, जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून केला खून

By दिपक ढोले  | Updated: March 29, 2023 15:12 IST

लग्नानंतर दोन मुली व दोन मुले झाली, त्यानंतर दोघांचे पटत नव्हते. यातूनच महिलेने पतीस सोडले

अंबड ( जालना) :  पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने जावयाने सासऱ्याचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना अंबड शहरातील शारदानगर येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पंडित भानुदास काळे असे मयताचे नाव आहे. घटनास्थळावरून तीन आरोपी फरार झाले आहे.

पंडित भानुदास काळे यांची मुलगी नंदा काळे हिचा विवाह आडूळ येथील संशयित किशोर शिवदास पवार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली व दोन मुले झाली. त्यानंतर किशोर व नंदा या दोघांचे पटत नव्हते. काही दिवसांपूर्वी ती पाचोड येथील एका व्यक्तीसोबत पळून गेली. त्यानंतर किशोर पवार हा नेहमी सासरा पंडित काळे  यांना शिवागाळ करीत होता. माझ्या बायकोला नांदायला पाठावा, नाहीतर तुम्हाला बघून घेईल, असेही तो म्हणत होता. 

दरम्यान, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पंडित काळे व  त्यांचा मुलगा पारलेश काळे दोघे घरी बसले होते. त्याचवेळी संशयित किशोर पवार, नितीन जाधव व एक अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी पंडित काळे यांना मारहाण करून शिवागीळ केली. कंबरेची बंदूक काढून किशोर पवार याने पंडित काळे यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मंदाकिणी भोसले यांच्या फिर्यादीवरून तीन संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना