शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचा जामीन का घेतला नाही ? जाब विचारत तिघांनी युवकाचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 19:05 IST

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

भोकरदन : सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील गोरखनाथ नामदेव जिवरग ( 35 ) याचा गळा आवळून निर्घृणपणे खून करून मृतदेह देऊळगाव कमान येथे टाकल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून अटक असलेल्या आरोपीचा जामीन का घेतला नाही यावरून लखन कांतीलाल भोसले ( रा. टाकळी जिवरग )  याच्यासह अन्य तिघांनी खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील रहिवाशी असलेल्या गोरखनाथ जिवरग यांचा मृतदेह भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमान पाटीजवळील गोषेगाव शिवारातील रस्त्यालगतच्या एका खड्डयात सोमवार दिनांक 20 डिसेंबर रोजी आढळून आला होता. या खड्यात सोमवारी सायंकाळी एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती हसनाबाद पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. मृताच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या व शरीरावर, डोक्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला होता. 

या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा मयताची पत्नी रेखा गोरख जिवरग यांच्या तक्रारीहून संशयीत लखन भोसले रा.टाकळी जिवरग व इतर दोन अनोळखी इसमा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलिस ठाण्यात भोसले यांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आले होते. त्यांच्याच जामिनासाठी भोसले व इतर लोक माझ्या पतीकडे तगादा लावून होते. मात्र त्यांनी अटक असलेल्या आरोपींचा जामीन घेण्यास नकार दिला म्हणून पतीचा खून करण्यात आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, हसनाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके, पोलिस कर्मचारी नामदेव जाधव, सागर देवकर, रामेश्वर सिनकर, शेख आसेफ, धनराज सुरे, नीलेश खरात, राहुल भागिले यांनी पाहणी केली.

आरोपींच्या शोधासाठी पथके रवानाया घटनेतील आरोपींच्या शोधासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असे हसनाबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष घोडके यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटोळे हे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीJalanaजालना