शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

खड्ड्यांसोबत सेल्फी काय घेता? विकासकामांचे बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:04 IST

राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : राष्ट्रवादीचे नेते फेसबुकवर खड्ड्यांसोबत सेल्फी काढून विकासकामांबद्दल प्रश्न विचारत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, फेसबुक सोडून प्रत्यक्षात समोरासमोर या आणि जाहीर चर्चा करा, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे दिले.जालना-वडीगोद्री मार्गाच्या काँक्रिटीकरणासाठी ३३७ कोटींचा निधी मंजूर करवून आणल्याबद्दल खा. दानवे यांचा अंबड तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.खा. दानवे म्हणाले की, तुमच्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही जिल्ह्यात कोणती विकासकामे केली, किती निधी आणला ते सांगावे. आमच्या केवळ तीन वर्षांत विकासकामांसाठी किती निधी आणला ते सांगतो. जिल्ह्यात तब्बल सहा हजार कोटींची केवळ रस्त्यांची कामे सुरु आहेत. एक हजार कोटी रुपयांच्या ड्रायपोर्टचे काम सुरु आहे. आयसीटी कॉलेज मंजूर केले, त्यासाठी २०० एकर जागा उपलब्ध करुन दिली. सीड्स पार्कचे काम सुरु आहे. जालना शहरात ६० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत, अशी अनेक विकासकामे सांगता येतील.सगळे मिळून माझा पराभव करु, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमात आहात. आता तुमची मला रोखण्याची काय बिशाद आहे? अशा शब्दात खा. दानवे यांनी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांना आव्हान दिले.आ. नारायण कुचे म्हणाले की, अंबड शहराचा जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याचे काम आम्ही केले. मात्र श्रेय लाटण्यासाठी आ. राजेश टोपे यांनी केविलवाणा प्रयत्न केला. शहरातील पाचोड नाका येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाच्या सुशोभीकरणासाठी १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून त्याचे कंत्राट निघाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी नगराध्यक्षा संगीता कुचे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, देविदास कुचे, साहेबराव खरात, दीपकसिंग ठाकूर, गंगासागर पिंगळे, अंबादास अंभोरे, चंद्रप्रकाश सोडाणी, अरुण उपाध्ये, संदीप काबरा, संतोष सोमाणी, किरण खरात, विश्वजित खरात, शहराध्यक्ष संदीप खरात, गंगाधर वराडे, सौरभ कुलकर्णी, राहुल खरात, फिरोज अध्यक्ष, विष्णू पुंड, अशोक लांडे, नारायण खले, ओमप्रकाश उबाळे, रमेश शहाणे, सुनील खानचंदानी, युसूफ मणियार, नसीर बागवान, अय्युब बागवान, राजेंद्र डहाळे, सुहास सोडाणी, अ‍ॅड. लक्ष्मण गायके, प्रसाद झाडे, अ‍ॅड. आशा गाडेकर, इंदुमती घुगे, शिवाजी बजाज, नीलेश लोहिया, ओमसेठ जाजू आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर मोहरीर यांनी केले.रावसाहेब दानवेच्या नादी लागणे एवढे सोपे नाही, ही तर सुरुवात आहे. पुढे बघा, तुम्हाला कशी पळता भुई थोडी करतो असे आव्हान खा.दानवे यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता दिले.