शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:25 IST

आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात आरोग्याचे प्रश्न सोडवून आरोग्य सेवेचा चेहरा आपल्याला बदलायचा आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे, अशी सूचना आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी दिली.जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी शिक्षण व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, सर्व सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह सर्व सदस्य, आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर बैठकीला सुरूवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी आरोग्य विभागाने केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा सांगितला. आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची परिस्थिती बिकट आहे. आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रांच्या इमारती मोडकळीस आल्या आहे. तसेच आरोग्य केंद्रातील साहित्य धूळ खात पडलेले आहे. जिल्हाभरात आरोग्य सेविका, सेवक व डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला तातडीने सोडायचे असून, या कामांसाठी आपण निधी कमी पडू देणार नाही.जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरा बदलायचा असेल तर अधिका-यांसह झेडपी सदस्यांनीही आरोग्य सेवा सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे. लवकरच राज्यभरातील रिक्त असलेली ४० ते ४५ हजार डॉक्टरांची पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्त पदांचाही प्रश्न सुटणार आहे.आपल्याला पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलायचा आहे.त्यामुळे लागेल तेवढा निधी आपण द्याला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींची उपस्थिती होती.पिंपरखेडा बु. येथील आरोग्य केंद्राला मंजुरीजालना जिल्ह्यात ४० आरोग्य केंदे्र कार्यरत आहेत. ३ आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाली आहे तर पिंपरखेडा येथील आरोग्य केंद्राला दोन दिवसांपूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. जिरडगाव येथील आरोग्य केंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या.आरोग्य केंद्रांकडे लक्ष द्याजालना जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे. आरोग्य केंद्रात आधुनिक उपकरणांचा वापर करा. आरोग्य केंद्राबाहेर झाडे लावून त्याची निगा राखा, निधीची गरज भासल्यास मी तुम्हाला निधी देतो. आरोग्य सेवेचे काम जालन्यातूनच होईल, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.तालुकास्तरावर सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारणारतालुकास्तरावरच सर्व सुविधा असणारे रूग्णालय उभारण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात हे रूग्णालय उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच काम करण्यात येणार आहे. तसेच मेन्टल आणि आयुष्य हे दोन्ही दवाखाने सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल