शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटरग्रीडमधून १७६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:52 IST

जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.मंठा तालुक्यातील बरबडा व कर्णावळ येथे अंतर्गत पाईपलाईन अंथरण्याच्या कामाचे उद्घाटन बुधवारी लोणीकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.यावेळी भुजंगराव गोरे, गणेशराव खवणे, संदीप गोरे, राजेश म्हस्के, कल्याण खरात, कैलास बोराडे, कैलास बोराडे, राजेश मोरे, पंजाबराव बोराडे, शिवदास हानवते आदींची उपस्थिती होती.लोणीकर म्हणाले की, जालना, मंठा व परतूर तालुक्यातील १७६ गावांना ग्रीड योजनअंतर्गत पाणीपुरवठा केला जाणार आहे. या कामासाठी ८ कोटी ४२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.या वेळी विष्णू फुपाटे, प्रदीप बोराडे, नागेश घारे, दत्तराव कांगणे, भगवान राठोड, निवास देशमुख, नरसिंग राठोड, माऊली गोंडगे, मुस्तफा पठाण, बंडू बिडवे, गणेश चव्हाळ, कल्याण कदम, सोपान खरात, रामकिसन मुसळे, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, त्र्यंबक हजारे, द्वारकादास चिंचाणे, गिताराम हजारे, प्रभाकर हजारे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बरबडा गावासाठी २१ लक्ष २८ हजार, कर्नावळसाठी १३ लाख ५१ हजार, उस्वद (देवठाणा) १३ लाख ३८ हजार तर वझर सरकटेसाठी ७ लाख ६६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाईपलाईनचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हे काम जूनपूर्वी करण्यात येणार आहे. विद्युत पुरवठ्याअभावी तसेच देयकाअभावी या योजनेचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सोलार योजनेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मंठा, परतूर तालुक्यातून जाणाऱ्या शेगाव-पंढरपूर दिंडी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.जिल्ह्यातील १५ हजार शेतक-यांना वीजजोडणी देण्याबरोबर १५ हजार ट्रॉन्सफार्मरची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजना