लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात उन्हाळा संपत असताना टंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. जिल्ह्यातील ५६ लघु तलावांपैकी ४१ लघु तलावातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. लघु प्रकल्पांसह सहा मध्यम प्रकल्पापैकी दोन तलाव कोरडे पडले आहेत.जिल्ह्यात यंदा एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी तापमान हे ४० ते ४२ अंश असेच राहिले. याचा मोठा परिणाम जनजीवनावर झाला. विहिरींच्या पाणीपातळीबरोबर जलसाठ्यात घट झाली. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सिंचनासह जनावरांसाठी आधार ठरणाऱ्या लघु तलावातील पाणीपातळीत यंदा कधी नव्हे तेवढी घट झाल्याचे दिसून आल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:01 IST