शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन

By महेश गायकवाड  | Updated: May 30, 2023 14:35 IST

महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही.

जालना : घनसावंगी तालुक्यातील शेवगळ गावात महिनाभरापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने पंधरा दिवसांपूर्वी टँकर सुरू करण्याची मागणी पंचायत समिती तसेच तहसीलदारांकडे केली; परंतु एकही अधिकारी गावाकडे फिरकला नाही. त्यामुळे संतप्त महिला व पुरुषांनी आज सकाळी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनानंतर पंचायत समितीचे अधिकारी गावात हजर झाले.

एक हजार ते बाराशे लोकसंख्या असलेल्या शेवगळ गावाला सात किलोमीटर अंतरावरील येवला येथील साठवण तलावाशेजारील विहिरीतून पाणीपुरवठा होतो; परंतु हा तलाव आटल्याने पाणीपुरवठा बंद झाला. गावातील तीनही हातपंपही नादुरुस्त आहेत. त्यामुळे गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्याने महिला व पुरुषांना दररोज सकाळी पाण्याची भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांना भेटून गावची हकीकत सांगितली; परंतु त्यानंतरही गावाला टँकर सुरू झाला नाही. त्यामुळे संतप्त महिला व ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

आंदोलनानंतर विस्तार अधिकारी गावातमहिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. शेवटी पाण्यासाठी गावकऱ्यांना आंदोलन करावे लागले. त्यानंतर विस्तार अधिकारी खिल्लारे मंगळवारी गावात आले. त्यांनी गावातील जलस्रोतांची पाहणी केली.

सर्व जलस्त्रोत आटले गावाची सार्वजनिक विहीर सात किमी अंतरावर आहे. तलाव आटल्यामुळे ती विहीरही कोरडी पडली आहे. गाव परिसरात पाण्याचे जलस्रोत नाही. शेतातील विहिरीवर जाऊन बैलगाडीतून पाणी आणावे लागते. गावातील सगळे हातपंप बंद आहेत. असे असताना प्रशासनाला आमच्या गावाचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही.- अनुसय रंनपिसे, ग्रामस्थ

ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत महिनाभरापासून पाण्यासाठी आमचे हाल सुरू आहेत. सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाही. ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव सादर केला. एकही अधिकारी गावातून येऊन पाहणी करून गेले नाही. त्यामुळे हे आंदोलन करावे लागले.- सुनीता गोरे, ग्रामस्थ

टॅग्स :water shortageपाणीकपातJalanaजालना