शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी; जालना जिल्ह्यातील ६७०० हेक्टरवरील शेतीला अवकाळीचा तडाखा

By विजय मुंडे  | Updated: November 28, 2023 19:03 IST

पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी : नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अधिकारी, कर्मचारी बांधावर

जालना : जिल्ह्याच्या विविध भागात सोमवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस झालेल्या अवकाळीमुळे अंदाजे ६७०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरही पाणी पडले आहे. झालेल्या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवरून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. पावसाअभावी रब्बी हंगामावरही परिणाम झाला असून, उपलब्ध पाण्यावर पिके जगविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मोठा खर्च करून रब्बीतील पिकांची जोपासणा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. परंतु, रविवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि गारपीट झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. फळपिकांनाही याचा फटका बसला. तर गारपीट झाल्यामुळे लहान- मोठी अशी तब्बल ५७ जनावरेही मयत झाली होती. तर चार घरांची पडझड या पावसात झाली होती. तर दुसऱ्या दिवशी साेमवारी रात्रीही जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ६७०० हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासकीय पथकांकडून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

दोन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारीजिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या तक्रारी पिकविमा कंपनीकडे केल्या आहेत. नुकसानीनंतर ७२ तासात संबंधित शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी १८००२००५१४२ या क्रमांकावर किंवा contactus@universalsompo.com या ई-मेलवर माहिती देणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणीअवकाळी पावसामुळे फळपिकांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची शिवारात झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह कृषी, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.मागील २४ तासात झालेला पाऊस

तालुका- मिमीभोकरदन- १६.९ मिमीजाफराबाद- १५.२ मिमीजालना- १८.३ मिमीअंबड- १४.१ मिमीपरतूर- ६.० मिमीबदनापूर- १०.६घनसावंगी- ५.८मंठा- ७.२

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसJalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र