शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदानच - बबनराव लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:04 IST

आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता

जालना : मरावाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी वॉटर ग्रीड योजना व्यवहार्य नसल्याचा मुद्दा पुढे करून ही योजना रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली खेदजनक आहेत, आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखल्याचा आरोप करून ती व्यवहार्य नसल्याचे सांगितले. त्यात तथ्य नसल्याचा दावा आ. तथा  माजी पाणीुपरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्र परिषदेत केला. 

मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील धरणांना जोडून ज्या भागात पाण्याची कमतरता निर्माण होईल ते पाणी त्या भागात ते वळविण्यासाठी ही योजना आम्ही आखली होती. यासाठी तज्ज्ञांकडून गेल्या ३५ वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास करून आराखडा तयार केला आहे. ही योजना निवडणुकांपूर्ची म्हणजेच दोन वर्षापासून यावर काम सुरू केले आहे. यासाठी आपण स्वत: इस्त्राईल, आॅस्ट्रेलिया, श्रीलंकासह गुजरात, तेलंगणा या ठिकाणच्या अशा प्रकारच्या योजनांना भेटी देऊन अभ्यास केला. यावेळी जीवन प्राधिकरण विभागातील तज्ज्ञ आमच्या सोबत होते. त्यामुळे यात आमचा कुठलाच राजकीय स्वार्थ नसल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान या योजनेसाठी आम्ही जरी २५ हजार कोटी लागणार आहेत, असे नमूद केले होते. परंतु एवढे पैसे सध्या देणे शक्य नसले तरी सरकारने आगामी अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५०० कोटी रूपये तरतूद करून ही योजना सुरू ठेवावी असा आमचा आग्रह राहणार आहे. यासाठी मराठवाड्यातील सर्व आ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना या योजनेचे मराठवाड्यासाठीचे महत्व आणि गरज पटवून देणार आहोत. एवढे करूनही जर काही झाले नाही, तर मात्र आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासह न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचे लोणीकरांनी स्पष्ट केले. 

वीज बिलाचा मुद्दा गौण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजने संदर्भात वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु ही योजना राबवितांना यात यापूर्वीच ५० टक्के सौर उर्जेचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संपूर्ण वीजेवरच ही योजना चालणार नाही हेही पवार यांनी लक्षात घ्यावे असे लोणीकर म्हणाले. आज या योजनेच्या निविदाही निघाल्या असून, त्यात अनेकजण गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणीJalanaजालनाMarathwadaमराठवाडा