शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन गणेशोत्सवात पाण्याचे विघ्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:55 IST

ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ऐन सणासुदीच्या दिवसात वीज वितरण कंपनीने वीज बिल थकल्याचे कारण देत शहरातील पंपहाऊसचा वीजपुरवठा खंंडित केल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सणासुदीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.नवीन जालन्यासाठी घाणेवाडी तलाव तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेच्या स्त्रोत आहे. जायकवाडीचे पाणी मस्तगड येथील पंपहाऊसमधून जुना जालन्यात वितरित होेते. तर घाणेवाडी तलावातून शहरात येणाऱ्या पाण्यासाठी विजेची गरज लागत नाही. परंतु फिल्टरबेडमध्ये पंपाना वीजपुरवठा केला जातो. महावितरण कंपनीकडून वीजबिल थकल्याने अनेकवेळा पाणी पुरवठ्याची वीज तोडली आहे. तर शहरातील काही भाग वगळता विद्युत खांबाचा वीज पुरवठा अनेक वर्षापासून बंदच आहे. विशेष म्हणजे शहरात पाण्याची मुबलक उपलब्धता असताना वीजपुरवठा खंडित केल्याने आठवडाभरापासून दिवपसापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प आहे. शहरातील हातपंपही नादुरुस्त असून पावसाचे पाणी न पडल्याने ते स्त्रोतही लोप पावत चालले आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठा शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना काही प्रमाणात सूट देण्यात येते, मात्र वीज वितरण कंपनी सणासुदीच्या तोंडावर नगरपालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र नगरपालिका आणि महावितरणच्या कलगीतु-यात नाहक सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकात संताप आहे. यावर तातडीने तोडगा काढून शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच अंतर्गत जलवाहिनीला जागोजागी गळती लागत असल्याने काही वार्डात दहा दिवसापासून पाणीपुवरवठा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक वर्षापासून बदलण्यात आली नाही. जीर्ण झालेल्या जलवाहिनीतून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने पाण्याची नासाडी होत आहे परिणामी शहरातील बहुतांश वार्डात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी आहेत. गळतीमुळे पिण्यायोग्य लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे न.प. ने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalana Muncipalityजालना नगरपरिषद