शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहते हे पाणी..न देखवे डोळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:17 IST

सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्हॉल्व्ह फुटल्याने वाया जात असल्याचे पाहून प्रत्येक जालनेकरांच्या डोळ्यात पाणी न आल्यासच नवल अशी अवस्था दुरूस्ती अभावी झाल्याचे वास्तव आहे.जालना शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तत्कालीन आ. कैलास गोरंट्याल यांनी स्वपक्षाचे सरकार असताना त्यांच्याशी दोन हात करून पैठण जालना पाणीपुरवठा योजना खेचून आणली. त्यासाठी त्यांनी कोणकोणती शक्कल लढवून अडचणींना तोंड दिले, हे जालनेकर विसरलेले नाहीत. ही पाणीपुरवठा योजना होण्यासाठी जवळपास २५० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. ही योजना मुळात ज्यावेळी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर होते, त्यावेळी त्यांनी जालना पालिकेत ठराव घेऊन ती पुढे रेटली. मात्र, सत्तांतर झाल्यावर माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी जोपर्यंत ही योजना पूर्ण होणार नाही, तो पर्यंत गळ्यात पुष्पहार न घालण्याची प्रतिज्ञा केली होती, आणि ती त्यांनी पूर्णही केली. भास्कर अंबेकरांप्रमोणच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी देखील त्यावेळी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली होती. एकूणच या योजनेच्या श्रेयवादावरून आजही चर्चा रंगतात ही बाब वेगळी. ही योजना व्हावी म्हणून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी देखिल या योजनेची लोकवर्गणी भरण्यासाठी भीकमांगो आंदोलन करून औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यासाठी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी हा लढा निशुल्क लढला होता. एकूणच आता तुम्ही म्हणाल पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून एवढा इतिहास कशासाठी सांगितला, परंतु एवढ्या कष्टाने आणलेल्या या योजनेला किरकोळ दूरूस्ती अभावी जर खीळ बसत असेल तर, ही गंभीर बाब आहे. अन्य विकास कामाच्या नावावर पालिका कोट्यवधी रूपये खर्च करत आहे. आणि आजच्या तंत्रयुगात जालना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जर ७०० व्यासाचा व्हॉल्व्ह मिळत नसेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात बुडती हे जन न देखवे डोळा... येतो कळवळा म्हणोणी. तशी अवस्था आज या गळतीची झाली आहे.आमच्याकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरूपाईपलाईन फुटल्याने त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी मोतीतलावात चर खोदून सोडले आहे. त्यामुळे मोतीतलावाची पाणीपातळी उन्हाळ्यातही कायम होती. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी आमचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. येत्या आठ दिवसात ही दुरूस्ती हाईल अशी आशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Waterपाणीnagaradhyakshaनगराध्यक्ष