जालना : जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही अनेक जण कोरोना रोगाला गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनाकडून आता कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून रामनगर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्यांकडून ३ हजार १०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. प्रशासन खबरदारी घेत असताना देखील अनेक जण कोरोना रोगाला गांभीर्याने घेत नसल्याने रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर असे निर्देश देण्यात आलेले आहे. मात्र या सूचनांचे कुठेच पालन होताना दिसत नसल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुकानात मास्क, सॅनिटायझरचा वापर आवश्यक करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून कार्यवाही केली जात आहे. या पथकात मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.डी. बिराजदार, पोलीस कर्मचारी ज्ञानोबा बिरादार, सतीश श्रीवास, नितीन खरात, भीमा पवार यांचा समावेश आहे
फोटो
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमले आहेत.