शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी

By शिवाजी कदम | Updated: July 17, 2023 19:28 IST

केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद

- अमोल राऊततळणी : केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून ही पदे भरण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागाच्या कारभाराला कंटाळून पालकांनी विद्यार्थ्यांचा दाखला काढल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाला आहे. येत्या काही दिवसांत इतरही वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना इतर शाळांची वाट धरावी लागली आहे.

मंठा तालुक्यातील जयपूर केंद्रांतर्गत केहाळ वडगाव येथे १ ते ८ पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या शाळेत १०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना तीन शिक्षक कार्यरत आहेत. अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी शिक्षक देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, याकडे शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त पालकांनी आपल्या मुलांच्या टीसी काढून इतरत्र शाळेत प्रवेश घेतला आहे. यामुळे विद्यार्थी संख्या घसरून ६० वर आली आहे. आठवीच्या २२ विद्यार्थ्यांनी दाखला काढून जयपूर येथील शाळेत प्रवेश घेतल्याने आठवीचा वर्ग बंद झाला आहे. ग्रामीण भागातील तळणी, किर्ला, उस्वद व जयपूर केंद्रातील शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असून पटसंख्येनुसार शिक्षक देण्याची मागणी होत आहे.

इतर शाळांमध्ये प्रवेशकेहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सातवीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आठवीच्या वर्गासाठी पात्र झाले. मात्र, अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी २२ विद्यार्थ्यांनी टीसी काढून इतरत्र प्रवेश केल्यामुळे आठवीचा वर्ग बंद झाल्याचे पालक सुरेश दवणे यांनी सांगितले.

पदवीधर शिक्षक मिळेनाकेहाळ वडगावच्या शाळेत पदवीधर शिक्षक पद रिक्त असून शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना इतरत्र प्रवेश दिल्यामुळे आठवीचा वर्ग जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वीच रिक्त पदांबाबत माहिती वरिष्ठांना दिली आहे.- ए.एम. चव्हाण, केंद्रप्रमुख, जयपूर

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalanaजालनाEducationशिक्षण