शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात

By दिपक ढोले  | Updated: July 15, 2023 11:44 IST

जालना ते देऊळगाव राजा रोडवर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीचा थरार

जालना : दारू पिऊन पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना एअर गन व खंजीरचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या अवघ्या चार तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. गणेश प्रल्हाद विधाते (२१, रा. लालबाग, जालना), साबेर सय्यद निसार सय्यद (२१, रा. चंदनझिरा, जालना), कैसर ऊर्फ सोनू सांडू शेख (२६, रा. मियासाब दर्गा मस्तगड, जालना), शेख आजम शेख मुख्तार (२२, रा. जमुनानगर, जालना), योगेश एकनाथ खणपटे (२८, रा. जमुनानगर, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन चाकू, एक एअर गण, दोन दुचाकी, मोबाइलसह लुटलेली रक्कम असा एकूण १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शुक्रवारी रात्री जामवाडी येथील इंडियन ऑइन पेट्रोलपंपावर पाच जणांनी कर्मचाऱ्यांना चाकू आणि एअर गनचा धाक दाखवून ३२ हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपींची ओळख पटविली. सुरुवातीला पोलिसांनी संशयित गणेश विधाते याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. अन्य चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांनी दारू पिऊन हा प्लॉन आखल्याचे पोलिसांनी सांगितले. चार तासांत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे.

यांनी केली कारवाईही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, योगेश सहाने, धीरज भोसले यांनी केली आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीJalanaजालना