केदारखेडा - भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील पूर्णा - गिरजा नदीपात्रात अनेक गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. परंतु, या विहिरी नदीपात्रात असूनही कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नदीकाठावरील गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पूर्णा-गिरजा नदीपात्रात केदारखेड्यासह मेरखेडा, जवखेडा ठोंबरे, वालसा, डावरगाव, बरंजळा यासह अनेक गावांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या विहिरी बारामाही पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या असल्या तरी या विहिरी जानेवारीतच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या वाळू उपशामुळे पाण्याचे स्त्रोत घटत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींजवळूनच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. यामुळे या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केदारखेडा येथील नदीपात्रात असलेल्या विहिरीचे पाणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच संपुष्टात आले. त्यामुळे गावाला दहा दिवस पाणी नव्हते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सव्वा लाख रूपये खर्च करून तत्काळ बानेगाव धरणातील पाईपलाईनची जोडणी करुन पाणीपुरवठा सुरळीत केला. एकूणच वाळू उपशामुळे गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कसरत
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाणीटंचाई आढावा बैठक झालेली नाही. यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. यासाठी शासनाने ऑनलाईन माहिती घेऊन गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सरपंच सतीश शेळके, सरपंच रवींद्र शेळके, सरपंच संजय जाधव, सरपंच समाधान वाघ, सरपंच बालाजी लोंखडे, सरपंच विशाल ढवळे यांनी केली.
===Photopath===
260221\26jan_12_26022021_15.jpg
===Caption===
केदाखेडा गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटली आहे.