शुक्रवार ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जुना जालना गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असून सोमवार पासून सप्ताहभर गरजूंना अन्नदानाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता गर्दी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे राहतील. याप्रसंगी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन संयोजक तथा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूदए कॉंग्रेस न.प गटनेते गणेश राऊत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत, विजय चौधरी, डॉ. विशाल धानुरे, मोहन इंगळे, चंद्रकांत रत्नपारखे, राजेंद्र गोरे, बदर चाउस, आनंद लोखंडे, दिनकर घेवंदे, आदींनी केले आहे.