शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

Valentine Day ; गावे पाणीदार करण्यासाठी झटणारे दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 13:57 IST

गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे.

- संजय देशमुख 

जालना : स्वत:चा मोठा उद्योग, व्यवसाय असताना ग्रामीण भागात जाऊन त्यांच्याशी सर्वार्थाने एकरूप होऊन तेथील केवळ पाणी समस्याच नव्हे तर त्या गावातील शिक्षण, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती तसेच धार्मिक कार्यक्रमांतून आपल्या परंपरा रुजवून त्यातून गावाला एकत्रित करून गावाचा चेहरामोहरा बदलणारे दाम्पत्य म्हणून जालन्यातील रघुनंदन लाहोटी आणि त्यांची पत्नी कविता लाहोटींची ओळख निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून लाहोटी दांपत्याने हा वसा जपला आहे.

आतापर्यंत जवळपास १५ पेक्षा अधिक गावांत जलसंधारणाचे काम केले असून, याचा श्रीगणेशा त्यांनी जालन्यापासून जवळच असलेल्या रोहनवाडी येथून केला. आज रोहनवाडी या गावाची तहान भागवण्यासह सिंचनाचा प्रश्न जवळपास निकाली निघाला आहे. धुळे जिल्ह्यातील देशी  गीरगार्इंचे संगोपन करून तेथील शेतीला पूरक व्यवसाय उभारला आहे. एवढेच नव्हे तर अद्ययावत दूध डेअरी उभारून शेतमजूराला मालक बनवण्याची किमया त्यांनी रोहनवाडीत साधली आहे.

अहंकार देऊळगाव, सारवाडीसह अन्य गावांमध्ये जाऊन या पती-पत्नीने लोकांना पर्यावरणाचे महत्त्व तसेच जलसंधारण ही काळाची गरज किती महत्त्वाची आहे, हे पटवून दिले आहे. केवळ भाषणबाजी न करता गावाचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करून ते जलसंधारणाची कामे करतात. रसायनमुक्त शेती करण्यासाठी त्यांनी चार वर्षापूर्वी सेंद्रीय शेतीसह झिरो बजेटचे प्रणेते सुभाष पाळेकर यांचे आठ दिवसांचे विशेष शिबीर रोहनवाडीत घेतले होते. या शिबिरानंतर संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती तसेच झिरो बजेट शेतीचे महत्त्व पटले. यामुळे विषमुक्त पिकांच्या उत्पादनाला चालना मिळाली आहे. 

रोहनवाडीचा कायापालटरोहनवाडी येथे उत्पादित दूध तसेच सेंद्रिय भाजीपाला विक्री करताना ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून, यातून जो काही नफा उरतो, तो पूर्णपणे त्या शेतकऱ्यांना मिळतो.त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळाले आहे.  सामूहिक गायत्री यज्ञाच्या माध्यमातून सर्वांना एका धाग्यात बांधून आपल्या गावाच्या विकासाठीच्या संदर्भातील शपथ घेण्यात येते. असे विविध सामाजिक उपक्रम हे दाम्पत्य राबविते.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेSocialसामाजिकsocial workerसमाजसेवक