लोकमत न्यूज नेटवर्कजालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी आंबेडकरी घराण्यासाठी व भारीप बहुजन महासंघात काम करून जिल्ह्यातील भारिपचे संघटन मजबूत करणार आणि वंचीत बहुजन आघाडीत सक्रीय काम करण्यासाठी नगरसेवक पदाचा शनिवारी निवासी उप.जिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला असल्याचे वैशाली ठोसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या प्रा. अंजली आंबेडकर या जालना शहरात आल्या होत्या, त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. जालना नगर पालिकेच्या निवडणुकीत वैशाली ठोसरे या वार्ड क्रमांक २९ मधुन शिवसेना पक्षाकडून निवडून आल्या होत्या. भारिप बहुजन महासंघाच्या प्रा. अंजली अंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारिप बहुजन महासंघात काम करून आंबेडकरी घराण्यासोबत एकनिष्ठ राहुन नगरसेवक पदाचा त्याग केला असल्याचे ठोसरे यांनी म्हटले आहे. आपन अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकर यांच्या सुचनेनूसार बहुजन वंचित आघाडीचेच एक निष्ठेने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
वैशाली ठोसरे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:45 IST