पारनेर येथे श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी यात्रा
अंबड : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे निधी संकलन यात्रा काढण्यात आली. गावातील विविध भागात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. जय श्रीरामच्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले होते. यात्रेचा समारोप गावातील हनुमान मंदिरातील महाआरतीने करण्यात आला. यावेळी प्रा. नानासाहेब गोडबोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अस्वच्छतेमुळे नागरिक, पादचाऱ्यांची गैरसोय
बदनापूर : शहरातील बसस्थानकासह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेमुळे येथे येणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुटलेल्या दुर्गंधीचा सामना करीतच प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन बसस्थानक परिरसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मेळावा
मंठा : अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंठा येथे तालुका मेळावा घेण्यात आला. यावेळी कॉ. अण्णा सावंत यांनी सरकारने अंगणवाडीचे कमी केलेले बजेट याबद्दल सविस्तर माहिती देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. डॉ. सुनंदा तिडके, कांता मिटकरी, कॉ. प्रभाकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सुनंदा तिडके म्हणाल्या की, जर आपला हक्क आपल्याला मिळवायचा असेल आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा प्राप्त करायचा असेल तर सरकारशी भांडायला पाहिले, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तालुका व परिसरातील अंगणवाडी ताईंची उपस्थिती होती.