शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी कहर; जालना जिल्ह्यात 'अवकाळी'मुळे ११५ कोटींची पिके उद्ध्वस्त !

By विजय मुंडे  | Updated: December 15, 2023 20:15 IST

जालना जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार शेतकऱ्यांना फटका

जालना : वादळी वारे, गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील रब्बी पिकांसह फळपिके, बगायती क्षेत्राला फटका बसला आहे. यात जिल्ह्यातील एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांचे ११५ कोटी ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल असून, या नुकसानीची भरपाई म्हणून निधीची मागणीही शासनस्तरावर केली जाणार आहे.

एकीकडे अवेळी पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. तर, दुसरीकडे रब्बी हंगामावर असलेली आशाही अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे मावळली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांसह रब्बीतील पिके, फळपिके व बागायती क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले होते. शासनस्तरावरून मिळालेल्या निर्देशानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एक लाख १६ हजार ९४५.५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याचा फटका एक लाख ९१ हजार २१९ शेतकऱ्यांना बसला असून, त्यांचे जवळपास ११५ कोटी ४० लाख ९४ हजार ५२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. या अपेक्षित निधीची मागणीही प्रशासकीय पातळीवरून शासनाकडे करण्यात आली आहे.

जिरायती पिके उद्धवस्तअवकाळी पावसामुळे एक लाख ४ हजार ७०१.८० हेक्टरवरील जिरायती पिके उद्ध्वस्त झाली असून, त्यात जवळपास ८८ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १० हजार १७९ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला असून, यात २२ कोटी ९० लाखांचे नुकसान झाले आहे. तर, २०६४.४५ हेक्टरवरील बागायती क्षेत्राला फटका बसला असून, यात ३ काेटी ५० लाख ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

आता निधीची प्रतीक्षागतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यामुळे ही स्थिती पाहता २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला जात आहे. त्यानुसार जवळपास ११५ कोटी ४० लाख रूपयांची नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. प्रशासकीय पातळीवरून मागणी नोंदविल्यानंतर मात्र शासनस्तरावरून मदत मिळणार कधी, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालना