शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

रावसाहेब दानवेंच्या भोकरदन तालुक्यात भाजप सुसाट: पहिल्या फेरीत ४ ग्रामपंचायतीवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 11:34 IST

पहिल्या फेरीच्या निकालानंतर भाजपाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जल्लोष केला.

- फकिरा देशमुखभोकरदन (जालना) : तालुक्यात रविवारी ३२ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी होऊन निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्या फेरीत लागलेल्या ५ ग्रामपंचायतीच्या निकालात भाजप पुरस्कृत पॅनलने आघाडी घेतली आहे. ४ ग्रामपंचायतीवर भाजप तर एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा उमेदवार सरपंच म्हणून विजयी झालेला आहे.

मंगळवारी शहरातील नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. आपल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी तालुक्यातील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी उसळली आहे. पहिल्या फेरीत करजगाव वरुड बु मोहळाई राजूर आणि निंबोळा या ग्रामपंचायतीच्या मतदानाची मोजणी झाली. यात करजगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी स्वाती लक्कस, वरुड बु.च्या सरपंचपदी  भाजपाच्या इंदूबाई पालकर, मोहळाईच्या सरपंचपदी भाजपाच्या रेणुका पालकर आणि भोकरदनच्या राजकारणा महत्वाची मानल्या जाणारी राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या प्रतिभा भुजंग यांचा विजय झाला. तर निबोळा गावच्या सरपंचपदी देखील भाजपाच्या दुर्गाबाई निर्मळ यांची वर्णी लागली आहे. पहिल्या फेरीच्या निकालानंतर भाजपाच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जल्लोष केला.

टॅग्स :Jalanaजालनाgram panchayatग्राम पंचायतraosaheb danveरावसाहेब दानवे